पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा खरा विज्ञानवादी - प्रा. डॉ. सागर धनगर ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

28/02/2022

पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा खरा विज्ञानवादी - प्रा. डॉ. सागर धनगर ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा खरा विज्ञानवादी - प्रा. डॉ. सागर धनगर
     सी व्ही रामन हे पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय होय. ज्या राष्ट्रांनी शिक्षणात पर्यायाने विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक केली ते राष्ट्र आज जगात अग्रेसर आहेत.  दैनदिन जगण्यातली विज्ञान समजून घेतले पाहिजे. शांत आणि जिज्ञासु मन संशोधनासाठी आवश्यक आहे. पडलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करणाराच खरा विज्ञानवादी होय. म्हणून मुलांना प्रश्न पडले पाहिजे आणि त्यांनी ते विचारले पाहिजे. जागतिक स्तरावरील बदलांसोबत जुळवून घेण्यासाठी शिक्षण आवश्यक असून शिक्षणावर केलेला खर्च हा खर्च नसून ती गुंतवणूक असल्याचे मत फैजपूर महाविद्यालयातील प्रा. डॉ. सागर धनगर (चोपडा) यांनी व्यक्त केले.
     येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर मुख्याध्यापक एस. डी. चौधरी, पर्यवेक्षक डी. एस. शुक्ल, ज्येष्ठ शिक्षक एस. बी. पाटील, विज्ञान शिक्षक बी. जी. माळी, सी.पी. चौधरी, ए. आर. महाजन, सौ. शीतल माळी यांची उपस्थिती होती. 
     विज्ञान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना डॉ. सागर धनगर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान गीते, नाटिका सादर केल्या. सूत्रसंचालन ए. आर. महाजन यांनी तर प्रास्ताविक सी. पी. चौधरी यांनी आभार प्रदर्शन बी. जी. माळी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp