चोपडा (प्रतिनिधी) :--
सेवानिवृत्त बी. एस. एफ. जवानाची फसवणूक ... चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. चोपडा शहरातील भिमान गृपचे मालक सतिश वाडे यांनी निलेश भिमराव अढायगे (वय ४१) सेवानिवृत्त (बी एस एफ) रा.कानळदा ता. यावल यांची सन २०१६ ते दिनांक ०४/०२/२०२२ या कालावधीमध्ये वेळोवेळी चोपडा शहरात तसेच अकुलखेडा ता.चोपडा येथील भिमान गृपचे कार्यालयामध्ये फसवणूक केली.
सविस्तर माहिती अशी की सन २०१६ ते दिनांक ०४/०२/२०२२ या कालावधीमध्ये वेळोवेळी चोपडा शहरात तसेच अकुलखेडा येथील भिमान गृपचे मालक सतिष सोमा वाडे त्याचा भाऊ जितेंद्र सोमा वाडे तसेच त्याच्या सोबत काम करणारे विशाल अर्जुन सदाशिव , बाविस्कर पुर्ण नाव माहित नाही अशांनी चोपडा शहरात लुबीनी वन येथील साईटवर १४७३ स्केअर फिट प्लाँट क्रमांक 55/W हा आरोपी सतिश वाडे यांचे अगर त्याचे पैकी कोणत्याही व्यक्तीचे नावे रजिस्टर नसताना अगर त्याचे मालकीचे नसताना देखील त्यांनी त्याचे फायद्यासाठी पुर्वे नियोजित कटकारस्थान रचुन सदरचा प्लाँट फिर्यादी निलेश भिमराव अढायगे (वय ४१) धंदा सेवानिवृत्त (बी एस एफ जवान) रा. कोळवद ता.यावल यांनी यांनी ९,१३,२६० एवढ्या किमती मध्ये विक्री करून सदर रक्कमे पैकी फिर्यादी यांनी आरोपीतांना रोख स्वरूपात २,२५०००/- रुपये तसेच चेक द्वारे व आँनलाईन १५००००/- असे एकुण ३,७५०००/- रुपये देवुन देखील ओरोपीतांनी सदरचा प्लाँट फिर्यादी यांना खरेदी करुन न दिल्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीतांना दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली असता आरोपीतांनी सदर पैश्यामधुन १ लाख रुपये परत करुन आज पावतो उर्वरित २,७५०००/- रुपये देण्यास नकार देवुन फिर्यादीचा विश्वास घात व केली आहे.
तसा गुन्हा... चोपडा शहर पोस्टे गु.रं.नं. भाग ५ CCTNS ३५/२०२२ भादवि कलम ४०६,४२०, १२० व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फसवणूक २०१६ ते २०२२ या कालावधी मध्ये वेळोवेळी चोपडा शहरात तसेच अकुलखेडा तालुका चोपडा येथील भिमान गृपच्याकार्यालयात फसवणुक झाली आहे.तरी सदर गुन्ह्याचा अधिक तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.
WhatsApp
No comments:
Post a Comment