जळगाव (प्रतिनिधी) :--
भारतात क्रिकेट एका धर्माप्रमाणे मानले जाते.क्रिकेट मुळे तरुण एकत्र येतात ... जि. प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील
आमच्या लहानपणी एक बॅट आणि बॉल असला की झाले क्रिकेट सुरू. एक बॅट असली तरी दुसरा रनर काठी, काडी घेऊन धावयचा. मुले चार असो व दहा असो बॅटबॉल सुरू. प्लॅस्टिक बॉल, रबरी बॉल, टेनिस बॉल ने मी क्रिकेट खेळलो. सिजन बॉल ने खेळण्याचा कधी योग आला नाही. क्रिकेट मुळे तरुण एकत्र येतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केले.
उमाळे ता.जळगाव येथे लकी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे उदघाटन जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे , युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, उमाळे सरपंच राजू पाटील, माजी सरपंच देविदास कोळी, उपसरपंच सुरेश धनगर, विकास सोसायटी चेअरमन शिवाजी मांडे, युवा सेना विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय लाड, ग्रामपंचायत सदस्य योगेश सोनवणे, योगेश खडसे, राजू गोविंदा पाटील, विकासो सदस्य अरुण पाटील, सुभाष साळुंखे, सुमित धनगर, जितू खडसे,अरुण कोळी,अनिल खडसे, प्रवीण बिऱ्हाडे,आयोजक सुमेध सोनवणे,गणेश खडसे, धनंजय साळुंखे, नंदकुमार चौधरी कंडारी व मान्यवर
WhatsApp
No comments:
Post a Comment