चोपडा (प्रतिनिधी) : --
पंकज प्राथमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव सप्ताह विविध सांस्कृतिक उपक्रमानी साजरा ...
जाणता राजा या ऐतिहासिक महानाटय आयोजनाचा अनुभव असलेल्या पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्राथमिक विभागात शिवजन्मोत्सव सप्ताह निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अश्वरूढ शिवराय चित्र 'रंगभरण स्पर्धा' व इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 'सामान्य ज्ञान', शिवराय प्रतिमा रेखाटन व रंगभरण, बोधकथा, शिवरायांचे पराक्रम पाठ वाचन घेण्यात आले.
शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एम व्ही पाटील व उपस्थित शिक्षकांनी केले. याप्रसंगी सुरुवात दिर्घ जयघोषात उन्मेष पाटील याने केली.इयत्ता चौथी वर्गतील रुद्र व संस्कार मित्र यांनी माय भवानी गीत सादर केले. कोमल व तेजस यांनी आमचे दैवत छत्रपती गीत गायन केले. अस्मित बाविस्कर याने शिवरायांची तलवार गीत हार्मोनियम वर वादन करून कला सादर केली. इयत्ता सहावी वर्गातील एकता मराठे ,रितिका महाजन व सहकारी मैत्रिणी यांनी माय भवानी ......गीत समूह नृत्य सादरीकरण केले. सुधीक्षण पाटील या विद्यार्थ्यांने "महाराजांची कीर्ती बेफाम ...... अफजलखान वध पोवाडा हुबेहूब गायन करून रोमांचक प्रसंग निर्माण केला. एकच राजा इथे जन्माला राजे पुन्हा जन्माला या ..... ये देश मेरे ...गीते ५ वी व ६ वी वर्गातील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले.यासाठी संगीत शिक्षक नितीन वाल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंती निमित्त शुभेच्छा देऊन उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थी व समूहाचा मंचावर पुष्प देऊन अभिनंदन व सत्कार केला. शेवटी प्रशांत पाटील यांनी शिवरायांच्या बालपण ते राज्यभिषेक सोहळा कार्यकाळ ,गाजवलेल्या पराक्रमाची उदाहरणे व मावळ्यांची स्वामिनिष्ठ कथा आपल्या मनोगतात मांडली व बोध दिला.
कार्यक्रम प्रसंगी अनिल पाटील, चंद्रशेखर चौधरी, गायत्री शिंदे, राजेंद्र पाटील, योगेश चौधरी, मनोज अहिरे, स्वप्निल ठाकूर , मयूर पाटील, धनश्री जावळे, जयश्री पाटील,सचिन लोखंडे, महेश गुजर, प्रियंका पाटील.शिक्षक उपस्थित होते. शेखर पाटील, सईद शेख, दिलीप बाविस्कर, प्रमोद पाटील,कैलास बोरसे, संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जैस्वाल यांनी केले. विद्यालयाचा सभागृह व परिसर "जय भवानी ... जय शिवाजी" व सांस्कृतिक कार्यक्रमाने दुमदुमून गेला. अभूतपूर्व शिवजन्मोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला..
WhatsApp
No comments:
Post a Comment