पंकज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिव जयंती उत्साहात साजरी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

20/02/2022

पंकज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिव जयंती उत्साहात साजरी ...

 

चोपडा प्रतिनिधी :---

    पंकज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिव जयंती उत्साहात साजरी  ...

      पंकज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिव जयंती मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेचे प्राचार्य संदीप वडनेरे अध्यक्षस्थानी होते.तर पालक प्रतिनिधि म्हणून हेमंत शर्मा उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.

    या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थिती लावली. इयत्ता १ ली व २ री च्या  विद्यार्थिनींनी "झुलवा पाळणा बाल शिवाजीचा " व इयत्ता ५ वी व ६ वी च्या  विद्यार्थिनींनी "माय भवानी" या गाण्यावर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या चित्र रेखाटन स्पर्धेत भाग घेतला . इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी थर लावून नृत्य सादर केले . विद्यार्थ्यांनी ढोल ताशा वाजवून कार्यक्रमाची रंजकता वाढवली.शाळेचे चित्रकला शिक्षक निखिल कोळी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सुरेख चित्र रेखाटले. तसेच सहाय्यक शिक्षक  प्रतीक चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराजांच्या विचारांना आणि त्यांच्या जीवन चारित्र्याला उजाळा देण्यात आला. भारतीय इतिहासातील महाराजांच्या महत्त्वपूर्ण योगदाना संदर्भातील आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराजांच्या गडकिल्ल्या विषयी माहिती आणि त्यांची रचना याविषयी किशोर पाचवणे यांनी माहिती करून दिली. विद्यार्थ्यांनी गड किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. अनिता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक दानिश शेख यांनी केले. 

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. रंजना तायडे , अनिता पाटील , भावना भाट ,शितल भावसार , तस्नीम शेख ,गणेश साळुंखे, किशोर पाचवणे, दानिश शेख , नितीन बाविस्कर ,निखिल कोळी , प्रतीक चौधरी, बाळू पाटील , सुलभा पाटील आदींनी परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp