मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी
वढोदा वनपरिक्षेत्रातील व सर्वच जंगलातील पाणवठे कोरडे ...
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी नागरी वस्तीकडे धाव ...
वढोदा वनपरिक्षेत्रात व इतरत्र सर्वच जंगलात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जंगलातील नाले ,तळे पूर्णतः आटतात व वन्य प्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे त्यांची पाण्यासाठी वन वन भटकंती होत असते. त्यांना पाणी मिळाले नाही तर तर ते नागरी वस्त्यांकडे भटकतात. पाण्या वाचून त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, त्यासाठी महाराष्ट्र शासना कडून वनविभागाला भरीव असा निधी देण्यात येत असतो. त्या अनुषंगाने वन विभागाने वन्य प्राणींसाठी जंगलामध्ये नियोजन करायचे असते. परंतु वढोदासह सर्वच वनपरिक्षेत्रात पाणवठयावर भरपूर खर्च केलेला आहे .फक्त बांधकाम केलेले आहेत.परंतु त्याच्यामध्ये पाणी टाकण्याचे काम वन विभागाचे कोणतेच कर्मचारी वा अधिकारी कुठेही दिसत नाहीत.
एखाद्यावेळेस वरिष्ठांची व्हिजिट होणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर रोडलगत व गावालगत आणि वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतात त्या ठिकाणी पाणवठे रातोरात टँकरने पाणी टाकून भरले जातात तेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवले जातात.मात्र जंगलातील पाणवठे कोरडी असतात कारण वरिष्ठ अधिकारी जंगलामध्ये फिरू शकत नाही व पाणवठया पर्यंत जाण्याची हिम्मत करू शकत नाही.
==================================
@ अशी सर्व परिस्थिती सातपुड्याच्या पायथ्याला असलेल्या सर्व तालुक्यात शिरपूर , चोपडा , यावल , रावेर , मुक्ताईनगर ते थेट बऱ्हाणपूर पर्यंत सगळीकडे आढळून येते. यावर वन विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. @
==================================
असे कामचुकार वरिष्ठ अधिकारी या वन विभागाला लाभलेले आहेत . त्यामुळे या सातपुडा पर्वतातील वन्य प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, याला पूर्ण कारणीभुत वन विभागातील वन मजूर ते सीएफ हेच आहेत. यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन कठोरातील कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी वन्य प्रेमी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
सर्व वन विभागातील कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी शासनाचे पगार घेतात परंतु शासनाचे काम करण्यामध्ये कामचुकारपणा करत असतात यांच्यावर कोणाचाही धाक नाही .स्वतःच मालक , चालक झालेले आहेत .वढोदा व सर्वच वनपरिक्षेत्रामध्ये पाणवठयांमध्ये मध्ये पाणी टाकण्याचा वर कागदोपत्री खर्च दाखवला जात असतो, मग यामधील बिले टाकून शासनाच्या तिजोरीतून पैसा काढला जातो ? मग हा पैसा कोणाच्या घशात जातो ? कुंपनच शेत खात आहे असा प्रत्यय वढोदा वनपरिक्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे .अशा प्रकारामुळे वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात आलेला आहे . मानव जातीला जर पाणी मिळाले नाही तर ते वरिष्ठ कार्यालय व वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांसमोर मोर्चा आंदोलन , उपोषण करतातं मुके प्राणी हे करू शकत नाही. वनविभागातील कर्मचारी-अधिकारी वरिष्ठांनी थोडीफार भूत दयाची आठवण होत नसेल ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
या अशा प्रकारामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्यामुळे गावाच्या दिशेने नागरी वस्त्या कडे धाव घेत आहे. पाण्याच्या शोधात काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये इलेक्ट्रिक करंट लागल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते .या वन्य प्राण्यांच्या मृत्यू ला कारणीभूत असणारे जे कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आमदार , खासदार या लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य पार पाडावे व मुक्या प्राण्यांना न्याय द्यावा अशी मागणी वन्यप्रेमी व सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment