युक्रेनहुन सुखरूप परत आलेल्या निलेश पाटील चे चोपड्यात जल्लोषात स्वागत व औक्षण ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/03/2022

युक्रेनहुन सुखरूप परत आलेल्या निलेश पाटील चे चोपड्यात जल्लोषात स्वागत व औक्षण ...

चोपडा प्रतिनिधी:---
     युक्रेनहुन सुखरूप परत आलेल्या निलेश पाटील चे चोपड्यात जल्लोषात स्वागत व औक्षण ...
      चोपडा येथील शशिकांत नगर मधील निलेश योगराज पाटील मागील चार वर्षापासून वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन या देशात वास्तव्यास होते. ते टर्नपिल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. रशिया - युक्रेन युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून , आपला जीव मुठीत घेऊन मायदेशी परतावे लागत आहे .त्यापैकी निलेश पाटील हे एक आहेत .आज चोपडा येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले .सर्वप्रथम औक्षण करून व फटाक्यांची आतिषबाजी करत मित्रमंडळी व नातेवाईकांनी त्यांचे खूप खूप स्वागत केले.
      ते मायदेशी परतत असताना टर्नपिल हून लविव मार्गे पोलंड बॉर्डर वर गेले. पण पोलंड बॉर्डरवर तोबा गर्दी असल्यामुळे ते पुन्हा परत लेविवला आले. तेथून वुझरोद  मार्गे स्लोवाकिया बॉर्डर येथे गेले तेथे भारतीय अंबसी यांनी राहण्याची व खाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. दुसर्‍या दिवशी त्यांना स्लोवाकिया बॉर्डर वरून एका विमानाने दिल्लीला रवाना केले. दिल्लीला एक दिवस महाराष्ट्र भवनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती व दुसऱ्या दिवशी विमानाने मुंबईला सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यात आले .तेथून सर्व विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
    ते आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, रशिया - युक्रेन युद्धामुळे  विद्यार्थ्यांवर अचानक आलेले संकट अतिशय भयावह होते . पण भारत सरकारने शर्थीचे प्रयत्न करून आम्हाला मायदेशी सुखरूप परत आणले. आमचे वैद्यकीय शिक्षण अजून किमान दीड ते दोन वर्षाचे बाकी आहे तरी भारत सरकारने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या अपूर्ण असलेल्या शिक्षणावर विचार करून योग्य तो मार्ग काढावा अशी अपेक्षा व चिंता निलेश पाटील यांनी व्यक्त केली.
    स्वागत प्रसंगी आजोबा विठ्ठल दामू पाटील( निवृत्त मुख्याध्यापक ) आजी  लक्ष्मीबाई विठ्ठल पाटील, विजय मोहन पाटील, अशोक मोहन पाटील, दिपेश पाटील, निशांत जाधव , प्रकाश पाटील , पत्रकार आर डी पाटील, डॉ जे डी चव्हाण आदी उपस्थित होते....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp