शहीदांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी -- प्रा. शामसिग वळवी ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

23/03/2022

शहीदांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी -- प्रा. शामसिग वळवी ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     शहीदांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी -- प्रा. शामसिग वळवी ...
     पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा शहिद दिन निमित्त क्रांतीकारकाना अभिवादन करण्यात आले. 
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर मार्गदर्शक म्हणून प्रा. शामसिग वळवी हे लाभले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिलीप गिर्‍हे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुणांचे प्रेरणास्थान असणारे क्रांतिकारक यांच्या कार्याची माहिती महाविद्यालयीन तरुणांना झाली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयीन स्तरावर करणे आवश्यक आहे असे स्पष्टीकरण केले.
       प्रा. शामसिग वळवी यांनी भारतीय स्वतंत्र चळवळीत क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. पंजाब बंगाल व महाराष्ट्र हे तीन प्रदेश भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे व क्रांतिकारकांचे महत्त्वाचे प्रांत होते. या तीनही ठिकाणी क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले. मवाळवाद, जहालवाद व गांधी तत्वज्ञान यापलीकडेही भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक महत्त्वाची विचारधारा कार्य करत होती, ती म्हणजे क्रांतिकारक, क्रांतिकारकांनी तरुणांना प्रेरित केले व तरुण मंडळींना भारतीय स्वतंत्र चळवळीच्या प्रवाहामध्ये आणण्याचे काम क्रांतीकारकांनी केले. 
      अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ महादेव वाघमोडे यांनी काकोरी कटावर प्रकाश टाकला. क्रांतिकारकांच्या कार्यामुळे ब्रिटिशांनी भारतीयांना स्वातंत्र्य बहाल केले. विद्यार्थ्यांनी या थोर क्रांतिकारकाकडून प्रेरणा घेऊन देशसेवेचे कार्य करावे असे आवाहन केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिलीप गिर्‍हे तर आभार प्रा. अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. दिलीप गिर्‍हे रासेयो कार्यक्रम अधिकारी, डॉ नंदिनी वाघ महिला सहायक कार्यक्रम अधिकारी, श्री किशोर शिंगाणे व श्री विवेक भोळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp