अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिला दिनी आरोग्य सेविकांचा सन्मान.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

09/03/2022

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिला दिनी आरोग्य सेविकांचा सन्मान....

   चोपडा (प्रतिनिधी) :---
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महिला दिनी आरोग्य सेविकांचा सन्मान....
         चोपडा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) तर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेविकांचा , परिचारिकांचा त्यांच्या कार्याच्या गौरव व सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार श्रीमती मनीषा धांडे श्रीमती आरती तायडे यांच्यासह इतर आरोग्यसेविका व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.
     अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( ABVP ) मार्फत राष्ट्रउभारणीच्या संदर्भातील विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. छात्रशक्ती हीच राष्ट्रशक्ती या घोषवाक्याच्या माध्यमातून ज्ञान , शील व एकतेचे रूप विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रतीत होत असते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चोपडा शाखेच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते .त्याचाच एक भाग ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका ,आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला.
       सदर कार्यक्रम प्रसंगी विशाल सोनवणे, हर्षल पाटील, भावेश पाटील, नम्रता महाले, समृद्धी पाटील, तेजू पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp