अश्विनी गुजराथी यांची लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी निवड - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

10/03/2022

अश्विनी गुजराथी यांची लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी निवड

चोपडा (प्रतिनिधी) :--
     अश्विनी गुजराथी यांची लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी निवड
    चोपडा येथील लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या महिलांनी चालवलेल्या पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या इनरव्हिल डिस्ट्रिक ३०३ च्या विद्यमान डिस्ट्रिक्ट चेअरमन, चोपडा नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका व भगिनी मंडळाच्या सहसचिव आहेत.
     पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. संस्थेच्या परंपरेप्रमाणे २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. पुरोहित यांनी केली. सन १९९० मध्ये स्थापन झालेल्या व १९७४ सभासद संख्या असलेल्या लक्ष्मी पतपेढीची चोपडा शहर व तालुक्यात महिलांनी चालवलेली पतसंस्था म्हणून वेगळी ओळख आहे.
     लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चोपडा चे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : चेअरपर्सन - अश्विनी प्रसन्न गुजराथी, व्हा. चेअरपर्सन - जागृती अशोक जैन, संचालक - सीमा मनोजकुमार अग्रवाल, रजनी राजेश सराफ, वैशाली नितीन गुजराथी, वैशाली अनिल अग्रवाल, वैशाली ईश्वर सौंदाणकर, ज्योती राजेंद्र गुजराथी, सुरेखा सुभाष देसाई, सरला जगन्नाथ माळी, सरला नरेंद्र शिरसाट.
        नवीन संचालक मंडळाचे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, लक्ष्मी पतपेढीच्या माजी चेअरपर्सन उर्मिलाबेन गुजराथी, कुमुदिनीबेन गुजराथी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. याप्रसंगी प्रसन्न गुजराथी, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, व्यवस्थापक शाम गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp