चोपडा टॅलेंट सर्च परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/03/2022

चोपडा टॅलेंट सर्च परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न ...

चोपडा  (प्रतिनिधी) :--
     चोपडा टॅलेंट सर्च परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न ...  
    चोपडा ग्लोबल व्हीव टीचर्स तर्फे आयोजित चोपडा टॅलेंट सर्च 2022 या परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा दि. ६ मार्च रोजी चोपडा नगरपरिषदेचे सौ. शरश्चंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा दिनांक 27 फेब्रुवारी, रविवार रोजी घेण्यात आली होती.  पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब पंकज बोरोले हे होतें, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अमर संस्थेचे अध्यक्ष  आण्णासाहेब चंद्रकांत पाटील, बालरोगतज्ज्ञ  डॉ. वाल्मिक पाटील, इनरव्हील क्लब ऑफ चोपडा च्या सचिव प्रा. सौ.आशा वाघजाळे, विवेकानंद इंग्लिश मेडियम च्या प्राचार्या सौ सुरेखा मिस्त्री ,पंकज ग्लोबल स्कुलचे प्राचार्य श्री मिलिंद पाटील व सेंट मदर टेरेसा इंग्लिश स्कूल चे संचालक श्री. विपिन बोरोले  हे होते. 
     या परीक्षेत सहभागी झालेल्या  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती. सुमारे 623 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदविला होता त्यापैकी यावेळी 17 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. तालुक्यातील 18 शाळांनी इंग्लिश माध्यमातून झालेल्या या परीक्षेत सहभाग नोंदविला होता. शाळानिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनाही विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक कु.मोहीत सोनवणे, चावरा इंटरनॅशनल स्कुल चोपडा या विद्यार्थ्याने प्राप्त केला.त्याला मान्यवरांच्या हस्ते संगणक हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक विजेता चि. निखील रवींद्र पाटील, पंकज विद्यालय चोपडा याला गिअर सायकल हे पारितोषिक तर तृतीय क्रमांक विजेता चि. सिध्दांत देवानंद वाघ, पंकज विद्यालय चोपडा यास स्मार्ट वाच अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
    अध्यक्ष पंकज बोरोले यांनी स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी सहभागी होणे महत्त्वाचे आहे, चोपडा शहराचा नावलौकिक स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण राज्यभर पोहोचविण्यात अशा स्पर्धा परीक्षांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन केले. अतिथी श्री.विपिन बोरोले यांनी त्यांच्या मनोगतात अशा स्पर्धा परीक्षांच्या यशस्वी आयोजनातून विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी तयार करण्यात ग्लोबल व्ह्यू टीचर्स यांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन केले. पालकांतर्फे श्री विजय भावसार व सौ सोनाली देवरे यांनी यानी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. पद्माकर पाटील यांनी तर सूत्रसंचलन प्रा. संदीप पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन श्री. संजय पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्लोबल व्ह्यू टीचर्स च्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp