शक्ती,त्याग व प्रेम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री होय ... - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

07/03/2022

शक्ती,त्याग व प्रेम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री होय ...

आमचे  (प्रतिनिधी) :--
    शक्ती,त्याग व प्रेम यांचा त्रिवेणी संगम म्हणजे स्त्री होय  
                  # #  स्त्री म्हणजे काय ?  # #
    स्त्री   म्हणजे माया, ममता, प्रेम, त्याग,  शक्ती , ज्ञान, संयम ,बलिदान  , आशा आकांक्षा, अपेक्षा,  सहनशीलता  या सर्व  गुणांचा संगम हा फक्त स्त्री   आणि स्त्रियांमध्येच आढळत असतो. जननी, माता, आई ,बहीण, पत्नी , प्रेमिका, मैत्रीण  म्हणजे स्त्री होय.या सर्व भूमिका स्त्रिया यथार्थ व योग्य पध्दतीने व सहजच पार पाडत असतात.स्त्रियांमध्ये ही सर्व शक्ती असल्यामुळेच परमेश्वराने त्यांना विभिन्न गुणधर्माने उपकृत केले आहे. घरातील सर्वात सहनशील व्यक्ती म्हणजे आपली आई होय.घरात सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी , आनंदी ठेवण्यासाठी , सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी आणि आनंद पाहण्यासाठी  ती आपलं आयुष्य झिजवत असते . महिला या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात विभिन्न भूमिकांमधून जात असतात.
      पहिल्यांदा मुलीच्या भूमिकेत असताना आपल्या आई वडिलांची काळजी ठेवतात त्यांना आधार देण्याचे व त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचे कार्य त्या  करत असतात . त्याचबरोबर बहिणीच्या भूमिकेत असताना आपल्या भावंडांशी प्रेमाने व लाडाने खेळतात  त्याबरोबर आपल्या लहान भावंडांना वळण लावायचे व सांभाळायचे कार्यसुद्धा आनंदाने त्या करत असतात आपल्या आई लहान भावंडांना त्या आयुष्य कसे जगावे हे आदर्श मूलमंत्र सुद्धा शिकवत असतात हे सगळे करत असताना तिला त्रास होत असला तरी त्रासाचा विचार न करता ती आपला आनंद फक्त इतरांमध्ये व इतरांच्या आनंदात पाहत असते. पत्नीच्या भूमिकेत असताना  सासू ,सासरे ,दीर, नणंद, जावा ,पती त्यांचे आप्तजन व नातेवाईक या सगळ्यांची काळजी घेण्याचे कार्य  त्या करत असतात ही जबाबदारी सांभाळताना ती  कधी स्वत:च्या जिवाचा किंवा स्वत:च्या तब्येतीचा ,स्वत:च्या भावभावनांचा , स्वत:च्या  आशा आकांक्षांचा  विचार करत नाही या सगळ्यांसाठी ती चंदनाप्रमाणे नेहमी झिजत असते  आपले कुटुंब नेहमी आनंदी राहावे एवढेच तिला वाटत असते कुटुंबाच्या सुख दु:खातच ती आपलं सुख व दु:ख पाहत असते या सर्वांना आनंदी पाहण्यासाठी ती आपलं सर्वस्व पणाला लावत असते  स्वत:च्या आशांचा त्याग करून, भावनांचा त्याग करून फक्त आपल्या कुटुंबासाठी आनंदाने जगण्यात आनंद मानते. त्यानंतर आई झाल्यानंतर मुलांची त्याबरोबर सगळ्या परिवाराची काळजी ठेवण्याचे कार्यही स्त्रीचं  करत असते पती व मुलांसाठी सकाळी उठून डबे तयार करण्यापासून ते सगळ्यांना  शांतपणे झोपी घालेपर्यंत तिचे कार्य अविरत चालू असते  पती नोकरीला किंवा व्यवसायाला बाहेर जात असतो , मुले शाळेत जात असतात. या सगळ्यांना अगदी सकाळी चार वाजता उठून चांगले भोजन द्यायचे कार्य ती आनंदाने करत असतात.हे सर्व करत असताना किती त्रास झाला तरी ती त्याची त्यांना जाणीव सुद्धा होऊ देत नाही.पती व मुले यांना रविवारी सुटी असते इतर सणासुदीच्या दिवशीसुद्धा सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी असते परंतु  पृथ्वीतलावर ,जगाच्या पाठीवर  आई हा एकमेव असा घटक आहे  की तिला कधीही सुटी नसते  रविवारी आपले पती मुले  घरी आहेत त्यामुळे ती जास्तीत जास्त कार्य करत असते  सणासुदीच्या दिवसांत आपण सगळे जण आराम करत असतो किंवा बाहेर जात असतो तेव्हा आपली आई मात्र घरात अविरत कार्य करत असते  असे स्त्रीचे त्यागी व बलिदान रूपी कार्य आयुष्यभर सुरू असते.      इतिहासाचे  पाण आपण पलटून पाहिल्यास आपल्याला दिसेल की  इतिहासात स्त्रियांचा प्रचंड पराक्रमी ,शौर्य, त्यागी, संयमी, बलिदानी इतिहास आहे . माँसाहेब जिजाऊ पासून ते आजपर्यंत स्त्रियांनी केलेले कार्य  अवर्णनीय आहे . माता भगिनी बहुजन कष्टकरी श्रमिक यांच्यावर  होणारे असंख्य अन्याय अत्याचार होणारे पाहून  आपल्या स्वत च्या मुलाच्या हातून स्वराज्य निर्माण करून घेणार्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब  यांचे कार्य अवर्णनीय आहे. जिजाऊ साहेबांमुळे आपणात सुखाचे दिवस पाहू शकत आहोत  त्यांनी शिवरायांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन स्वराज्य निर्माण करण्याचे  कार्य केले. त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचे द्वारे खुली करून देणाऱ्या सावित्रीआई फुले होय पूर्वीच्या काळात चूल व मूल एवढेच  स्त्रीचे स्थान मानले जायचे  परंतु या सर्वातून स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करून देऊन त्यांना  जगण्याचा हक्क प्राप्त करून देणार्या सावित्री आईंचे कार्य हे अवर्णनीय आहे असंख्य अन्याय अत्याचार सहन करून सुद्धा त्यांनी हे कार्य अविरत चालू ठेवले कर्मठ समाजाने  त्यांच्यावर शेण फेकून मारले परंतु त्यांनी त्याचा चंदन म्हणून स्वीकार केला. त्यांनी त्यांचा बहिष्कार केला परंतु त्यांनी त्या लोकांचा तिरस्कार केला नाही .लोकांनी सावित्रीबाईंची प्रेतयात्रा काढली परंतु त्यांनी शिक्षणाची रथयात्रा व आपले कार्य थांबविले नाही   लोकांनी त्यांना दगड गोटे मारले परंतु त्यांनी समाजामध्ये वैचारिक फुले पेरली. आज आपल्या देशातील स्त्रिया राष्ट्रपती पंतप्रधान व विभिन्न अशा मोठ्या पदावर कार्यरत आहेत  याचे सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांना जाते.  फातिमाजी शेख यासुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या त्यांनीसुद्धा असंख्य अडीअडचणींचा सामना केला व स्त्रियांना शिकवण्याच्या कार्यात मोलाची साथ दिली असे असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील त्यामध्ये म्हणजे अहिल्याबाई होळकर  ज्यांनी स्वबळावर बहुजन कष्टकरी व शेतकरी समाजाला योग्य न्यायप्रिय  असे राज्य देण्याचे कार्य केले . न्यायप्रिय व आदर्श राज्यकर्त्या म्हणून त्यांचं नाव घेतले जाते. यात आपण रमाईंचे कार्य त्याग व संघर्ष विसरता कामा नये . प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते हे रमाईंच्या उदाहरणांवरून सिद्ध होते. असंख्य अडचणींचा सामना त्यांनी केला परंतु बाबासाहेबांना त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही .स्वतः त्रास सहन केला, दु ख, यातना सहन केल्या. परंतु बाबासाहेबांचे  लक्ष विचलित होऊ नये म्हणून त्यांनी सगळे यातना व दु ख सहन केले.  आता सध्याच्या काळातील सिंधुताई सपकाळ यांचे उदाहरण  हे तर फार त्यागाचे , बलिदानाचे  व आदर्श मातेचे उदाहरण आहे  उदाहरण आहे.असंख्य अनाथ मुलांच्या माई म्हणाल्या सिंधूताईंचे कार्य अवर्णनीय आहे. त्यांनी आपला देह या अनाथ मुलांचे  पालनपोषण करण्यासाठी झिजविला. अनाथांची माय म्हणून त्यांचा लौकिक आहे .आपल्या  इतिहासामध्ये जिजाऊसाहेब, सावित्रीबाई फुले ,फातिमा जी शेख, रमाई आंबेडकर  , अहिल्याबाई होळकर , सिंधूताई सपकाळ अशा महान व आदर्श   स्त्रिया होऊन गेल्या त्या सगळ्यांच्या कार्यामुळे     आपल्या देशाला , देशातील स्त्रियांना नव्हे तर सर्व समाजाला चांगलेच सोन्याचे दिवस पाहण्याचा योग आलेला आहे.
     जगाच्या पाठीवर व इतिहासात आपण जर स्त्रियांनी केलेले कार्य पाहिले तर ते अवर्णनीय व शब्दांच्या पलीकडच्या आहे.आजच्या काळात कल्पना चावला , इंदिरा गांधी , प्रतिभाताई पाटील , किरण बेदी , हिमा दास एक ना अनेक असे उदाहरणं सांगता येतील की ज्यांनी आपल्या नावाने व कर्तृत्वामुळे आपल्या कुटूंबालाच नव्हे  , राज्याला नव्हे तर देशाला गर्व वाटेल असे कार्य केले आहे .स्त्रिया या कमजोर  नसून कोमलतेचा प्रतीक आहेत. जो कणखरपणा , त्यागी वृत्ती, लढाऊ बाणा  ,अभ्यासूवृत्ती  , संवेदनशीलता  , आदर्शवाद  , प्रेमळ भाव , नम्रता  , स्त्रियांना च्या अंगी असतो तो इतर  कुठेही दिसत नाही . स्त्रियांनी गाजविलेले पराक्रम हे अवर्णनीय आहेत महिला दिनानिमित्त इतिहासातील  भूतकाळात व वर्तमानकाळात कार्य करणाऱ्या व आपल्या कार्याने आपल्या देशाला नावारूपाला आणणाऱ्या सर्व महिलांना माझा मानाचा मुजरा .
                                                    व्याख्याते व लेखक
                     डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर
                   सचिव - शोभाई निराधार वृद्धाश्रम

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज