ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी चोपडा तालुक्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

07/03/2022

ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी चोपडा तालुक्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     ज्येष्ठ नागरिक संघाकडून जागतिक महिलादिनी चोपडा तालुक्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान 
    'आजादी का महोत्सव' अंतर्गत आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ चोपडाद्वारा कर्तृत्ववान नारी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या ८ मार्च रोजी हा महिला सम्मान समारोह व पुरस्कार सोहळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या नारायणवाडी, विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या भवनात दुपारी ठीक ४ वाजता होणार आहे. या सन्मान पुरस्कार सोहळ्यामध्ये चोपडा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सुरक्षा, साहस यांसारख्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सौ. ताराबाई दिलीपराव पाटील (माजी नगराध्यक्षा, चोपडा नपा.), सौ. पूनम आशिषलाल गुजराथी (सिनेट सदस्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), श्रीमती प्रा. आशा रमेश वाघजळे (शिक्षणतज्ज्ञ-सुत्रसंचालिका, चोपडा), या मान्यवरांच्या हस्ते, तर डॉ. सौ. तृप्ती राहुल पाटील (नेत्ररोग तज्ञ, चोपडा) यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व्ही. एस. करोडपती, उपाध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, सचिव प्रमोदनाना डोंगरे आणि महिला विभागप्रमुख शंकूतलाबेन गुजराथी यांनी केले आहे.
              ##  यांचा होणार सन्मान   ##
श्रीमती ललिता रमेशसिंग परदेशी (आरोग्य सहायिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले), श्रीमती मिना गोरख पाटील (अंगणवाडी सेविका, घुमावल बु.), श्रीमती योगिता हरी न्याहळदे (अव्वल कारकून, तहसील कार्यालय, चोपडा), श्रीमती रत्ना पंढरीनाथ बडगुजर (महिला होमगार्ड, चोपडा युनिट), श्रीमती वैशाली मधुकर पाटील (तलाठी, मंगरूळ, ता. चोपडा), श्रीमती मनीषा खुमानसिंग बारेला (तलाठी, वडती, ता. चोपडा), श्रीमती रत्नमाला हंसराज शिरसाठ (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, चोपडा), श्रीमती अनिता विलेश सोनवणे (स्टाफ नर्स, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा), श्रीमती विमलबाई भिल (वर्डी, ता. चोपडा), सौ. पल्लवी रुपेश नेवे (महिला पोलीस, ग्रामीण पोलीस स्टेशन, चोपडा), श्रीमती हेमलता महेंद्र पाटील (तलाठी, गरताड, ता. चोपडा), श्रीमती भावना अरुण सांगोरे (फॉरेस्टर, सामाजिक वनीकरण विभाग, चोपडा), श्रीमती प्रतिभा आबाजी पाटील (अंगणवाडी सेविका, मजरेहोळ, ता. चोपडा), सौ, लक्ष्मीबाई राजेश पालिवाल (समाजसेविका, चोपडा), सौ. सुनिता तेरसिंग बारेला (आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागलवाडी, ता. चोपडा), श्रीमती मंगला प्रताप निकुंभे (आशा वर्कर, चोपडा).

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp