जर कुणी कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणत असेल तर याद राखा :-- जगन्नाथ बाविस्कर - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/03/2022

जर कुणी कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणत असेल तर याद राखा :-- जगन्नाथ बाविस्कर

चोपडा(प्रतिनिधी) :--
    जर कुणी कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणत असेल तर याद राखा :-- जगन्नाथ बाविस्कर
    महाराष्ट्र आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे नुकताच आदिवासी जमातींच्या न्याय व हक्कासाठी महामेळावा घेण्यात आला. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे आयोजन माजी पोलिसअधिकारी भाऊराव बागूल (नंदुरबार), उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे (जळगाव) यांनी केलेले होते.हा मेळावा यशस्वीपणे संपन्न झाल्याने शहादा येथील फोटोग्राफर संदीप वळवी नामक व्यक्तीने व्हॉटसअपच्या माध्यमाद्वारे गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.आदिवासी कोळी समाजाची बदनामी करतांना त्याने आपल्या पोस्टमध्ये या मेळाव्याला "बोगस कोळींचा महामेळावा" असे म्हणतांना इतरही आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे.याबाबत आदिवासी कोळी समाजामध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.ह्या व्यक्तिवर आदिवासी कोळी जमातीची बदनामी केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असुन सर्वस्तरातुन त्याचा निषेध केला जात आहे.
    विशेष म्हणजे आजपर्यंत आदिवासी कोळी समाजाने इतर आदिवासी जमातींबाबत कधीच आक्षेप घेतलेला नाही.किंवा कुणाच्या विरोधात खोट्या केसेस वगैरे दाखल केलेल्या नाहीत. शासन प्रशासनातर्फे कोळी जमातीला हेतुपुरस्सर वेठिस धरले जात असुन त्यासाठी कोळी समाजाचे नेते आपापल्या परीने समाजाच्या न्याय्य व हक्कासाठी सतत संघर्ष करीत आहेत.मग इतर आदिवासी जमातींनी कोळी समाजाला बोगस आदिवासी का म्हणावे ? जर यापुढे कुणी कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणत असेल तर याद राखा,अशा समाज विघातक प्रवृत्तींच्या विरोधात राज्यभर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,असा सज्जड दम व कडक राखा  चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp