महादेव मंदिर उभारणी साठी श्री.संदीप सावळे यांच्याकडून ७१ हजार रुपयांची देणगी - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

02/03/2022

महादेव मंदिर उभारणी साठी श्री.संदीप सावळे यांच्याकडून ७१ हजार रुपयांची देणगी

चोपडा  (प्रतिनिधी) :--
    महादेव मंदिर उभारणी साठी श्री.संदीप सावळे यांच्याकडून  ७१ हजार रुपयांची देणगी ...
   महाशिवरात्री निमित्ताने अनिल तांबेकर,मेहमूद बागवान व आसिफ बागवान यांचे कडून महाप्रसाद 
    चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणीसाठी पावन भूमीवर महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद भंडारा  कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी महा दाते श्री.संदीप सावळे यांनी  ७१ हजार रुपयांची देणगी देऊन मंदीर बांधकामासाठी योगदान दिल्याने त्यांचे टाळ्यांच्या गजरात जोरदार अभिनंदन करण्यात आले.शिवाय साबुदाणा खिचडी, केळी व द्राक्षांचा महाप्रसाद देणाऱ्या दात्याचेही आभार व्यक्त करण्यात आले.
   काल, दि 1 मार्च 2022 रोजी महाशिवरात्रिचे औचित्य साधून भगवान महादेवाची प्रतिमा पुजन करुन  संपुर्ण भारत वासियांचे आरोग्य चांगले राहो ,सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली . महाप्रसादासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिलभाऊ तांबेकर यांनी साबुदाणा खिचडी, सामाजिक कार्यकर्ते मेहमूदभाई बागवान यांचे तर्फे १ हजार ०१ केळीचे तर सिमला फ्रूटचे आसिफभाई बागवान यांच्याकडून द्राक्षे असा त्रिगुणी महाप्रसाद देण्यात आला. यात सर्वधर्म समभावतेचा मेळ घातला गेल्याने कार्यक्रमात मोठा भक्ती भाव दिसल्याने "हम सब एक है" ची प्रचिती आली. महाशिवरात्रीचे औचित्य साधत महा दाते श्री.संदीप सावळे सरांनी सपत्नीक आपल्या कुटुंबियांसमवेत ७१ हजार रुपयांची भरीव देणगी पत्रकार महेश शिरसाठ यांच्याकडे देऊन मंदीर बांधकामासाठी मोलाचे योगदान दिले.
   यावेळी  बांधकाम कॉन्टॅक्टर श्री.सोपान मराठे, श्री.शाम बडगुजर, श्री.डॉ.रविंद्र बडगुजर, श्री.देवरे, श्री.गोपाल झिपरू मराठे, श्री. भटूशेठ सोनार, श्री.भारत राजपूत, श्री.रवींद्र रामदास बडगुजर, श्री.रतिलाल बडगुजर, श्री.भटूशेठ बडगुजर श्री.आप्पा मासरे, श्री.प्रमोद पाटील , श्री.राजेंद्र बडगुजर, श्री.देवांग,श्री.प्रा.पियुष चव्हाण श्री.प्रकाश चौधरी, श्री.प्रवीण राजपूत, श्री.सुरेश पाठक, श्री.गणेश पाटील, श्री.सुमित सोनार, श्री.रोहित सोनार, श्री.उत्तम पाटील ,श्री.चेतन देवरे , श्री.रणछोड लोहार, श्री.कैलास शिरसाठ, श्री.श्रेयस भावे , श्री.दीपक तायडे, श्री.गणेश सोनार, श्री.पंकज पाटील, श्री.किरण लोहार , श्री.प्रफुल्ल पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.श्री.पियुष चव्हाण,भावेश सोनवणे,प्रणव राजपूत,शुभम साळुंखे, भैय्या सावळे, सुनील सोनवणे,बंटी बडगुजर,चेतन राजपूत,शिव मराठे, हरिओम बडगुजर,निखिल बडगुजर आदिंची मेहनत घेतली.यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp