महाराष्ट्र वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी 15 मे पासून एन.सी.ई.आर.टी. प्रशिक्षण देणार ...
नव्वद हजार शिक्षकांना एससीईआरटीचे प्रशिक्षण मुंबई : सेवेची 12 व 24 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील तब्बल 90 हजारांहून अधिक शिक्षकांना Teachers वरिष्ठ वेतन आणि निवड श्रेणीसाठी 15 मेपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण ( NCERT ) प्रशिक्षण दिले जाणार आहे . हे प्रशिक्षण 14 जूनपर्यंत चालणार आहे . कोरोनामुळे शालेय शिक्षण विभागाकडून गत दोन वर्षांत निवड व वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले नव्हते . शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी येत्या मे महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे . शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेण्यासाठी आधी प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करणे आवश्यक आहे . करोनासह इतर काही कारणास्तव मागील काही वर्षांमध्ये हे प्रशिक्षण झालेच नव्हते . प्रशिक्षणच होत नसल्यामुळे शिक्षकांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे . विविध शिक्षक संघटनांनी प्रशिक्षणाचा विषय मार्गी लावण्याचा आग्रह थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेच धरला होता . शासनाकडून प्रशिक्षणास ग्रीन सिग़लही मिळाला आहे . त्यानुसार विद्या प्राधिकरणाकरणाने डिसेंबरमध्ये शिक्षकांची ऑनलाइन नोंदणी करून घेतली . तज्ज्ञांकडून प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम केला असून त्याची तपासणी करण्यासाठी विशेष समितीही नियुक्त केली आहे . प्रशिक्षणासाठी ई कन्टेंट तयार केला आहे .

No comments:
Post a Comment