माळी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा ...
तेजस महाजन व कुलदीप महाजन या बंधुंची थॉयलंडमध्ये पिकलबॉल स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ कामगिरी ...
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले यांच्याकडून आशिया ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिप 2022 मध्ये ११ एप्रिल ते १७ एप्रिल या दरम्यान थायलंड येथील थानापूरा पुकेट येथे झालेल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतीय टीमने सहभाग नोंदविला. या स्पधेसाठी भारतीय टीम मार्फत चोपडा येथील पिकल बॉल क्रीडापटू तेजस महाजन व कुलदीप महाजन यांनी प्रतिनिधीत्व केले. अरविंद प्रभू सर (मुंबई) व सुरेश भंसाळी सर(मुंबई) यांनी तेजस यास पॉन्सर केले होते तर कुलदीप यास अरविंद प्रभू सर यांनी केले होते. सुरुवातील इंडीया टीमसाठी खेळताना ऑल इंडीया टीमने सिल्वर मेडल मिळविले.
तसेच वैयक्तीक मध्ये तेजस यास ओपन मेन्स कॅटेगीरीत (सिंगल) सिल्वर मेडल मिळाले.ओपन मिश्र दुहेरी टीममध्ये तेजस सिल्वर मेडल मिळाले तरअॅडव्हान्स मेन्स सिंगल मध्ये सुद्धा तेजस ने कास्य पदक मिळविले तसेच तेजस याने मेडल बरोबरच रोख रक्कम स्वरूपात ही बक्षिसं मिळवले.
कुलदीप याने सुद्धा टीम इन्व्हेंटमध्ये (ऑलटीम) सिल्वर मेडल मिळविले तर अॅडव्हान्स मिश्र दुहेरीत ही कुलदीप ने गोल्ड मेडल मिळविले. या दोघी बधुंना पिकलबॉल स्पर्धेचे मार्गदर्शक चोपडा येथील भुपेंद्र पोळ सर यांचे मार्गदर्शन लाभत असते.या अगोदर सुद्धा हे दोघे बंधू नांदेड, बेंगलोर, उत्तराखंड, इंदूर, जयपूर,मुंबई जिमखाना तसेच नेपाळ या विविध ठिकाणी विजेते ठरलेले असून त्यांनी विविध मेडल मिळवलेली आहेत. त्यांच्या या यशामध्ये त्यांचे वडील श्री. रविंद्र नारायण महाजन व आई सौ.माया रवींद्र महाजन यांची मोलाची साथ त्यांना लाभत असते.त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व मित्रमंडळी, समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
यापुढे लवकरच ह्या दोन्ही बंधूंना पुढे विविध देशात पिकल बॉल स्पर्धेसाठी खेळायला जाण्याची संधी मिळणार आहे.

No comments:
Post a Comment