अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरीलवरील रेल्वे उड्डाणपूलाचे लवकरच होणार व्हर्चुअल लोकार्पण - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/04/2022

अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरीलवरील रेल्वे उड्डाणपूलाचे लवकरच होणार व्हर्चुअल लोकार्पण

अमळनेर (प्रतिनीधी) :-- पंकज पाटील
       अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरीलवरील रेल्वे उड्डाणपूलाचे लवकरच होणार व्हर्चुअल लोकार्पण ...
      केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींचे आ.अनिल पाटील यांना आश्वासन ....
    अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास येऊन हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना लवकरच या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.
    याबाबत आ.अनिल पाटील हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना आ.अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाच्या निमित्ताने ना.गडकरी यांची भेट घेतली होती,त्यावेळी त्यांनी अमळनेर येथील नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी तारीख मिळावी अशी विनंती आ.अनिल पाटील यांनी केली होती,तसेच माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी देखील आ.अनिल पाटील यांच्या वतीने उड्डाण पुलाचे लवकर लोकार्पण करावे अशी विनंती ना.गडकरी यांना केली होती,त्यामुळे ना गडकरी यांनी लवकरच तारीख कळविली जाईल असे आश्वासन आमदारांना दिले होतें.दरम्यान  ना.गडकरी यांच्या जळगाव जिल्ह्या दौऱ्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून ते जळगाव येथून विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत,त्यात अमळनेर येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण देखील समाविष्ट केले असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांना केंद्रीय स्तरावरून कळविण्यात आली आहे.येत्या एक दोन दिवसात अधिकृत तारीख आपल्याला प्राप्त होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.
               आ.अनिल पाटील यांचे अनेक वर्षांपासून ना. गडकरी यांच्याशी विशेष पारिवारिक संबंध असून या संबंधामुळे केंद्रीय स्तरावरील अनिल पाटील यांचे कोणतेही काम असो ना. गडकरी यांची विशेष मदत त्यांना होत. असते, पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश करण्यासाठी देखील ना गडकरी आमदारांना सहकार्य करीत असून आता उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचीही ग्वाही दिल्याने राजकारणात पक्षविरहीतही अनेक चांगल्या गोष्टी घडतात हेच यातून स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp