समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे ग्रामीण शिबीर संपन्न .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

17/04/2022

समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे ग्रामीण शिबीर संपन्न ....

चोपडा (प्रतिनिधी) :--
    समाजकार्य महाविद्यालय, चोपड्याचे ग्रामीण शिबीर संपन्न ....
     भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय,चोपडा येथील प्रथम वर्ष समाजकार्य स्नातक व प्रथम वर्ष समाजकार्य पारंगत च्या विद्यार्थ्यांचे ग्रामीण शिबीर अनुदानित आश्रमशाळा, सत्रासेन ता.चोपडा येथे संपन्न झाले. शिबिराचे आयोजन दि,.07एप्रिल ते 13एप्रिल 2022 या कालावधीत करण्यात आले होते.
     शिबिरादरम्यान क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांच्या निर्देशानुसार विविध ग्रामविकासात्मक उपक्रम राबविण्यात आले. लोकसहभागीय ग्रामीण मूल्यावलोकन, बेटी बचाव - बेटी पढाव अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती अभियान, झाडे जगवा - झाडे वाचवा अभियान, अंधश्रध्दा निर्मूलन अभियान इ.सारखे  अनेक उपक्रम राबविण्यात आले. 
      या शिबिरादरम्यान डॉ. भावना भोसले, श्री. जितेंद्र महाजन, डॉ.भरत खंडागळे, प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ.नरेंद्र शिरसाट, डॉ.आयुब पिंजारी, प्रा.बी.एस. पवार, पुरुष अधिक्षक मनोज महाजन, महिला अधीक्षक शितल पाटील आदी. मान्यवरांनी विविध वेगवेगळ्या विषयांवर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
      शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी मशाल फेरीचे आयोजन केले होते. गाव इतिहास ग्रामस्थांच्या मदतीने  समजवून घेतला. ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवारफेरी केली. विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ग्राम सामाजिक नकाशा, हंगामी नकाशा, चपाती नकाशा इ.तयार केले. ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामीण सहभागीय मूल्यावलोकन केले.
      या ग्रामीण शिबिरादरम्यान राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक शिबिरार्थीनी आणि आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.उत्तम सोनकांबळे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले. 
       ग्रामीण शिबिरादरम्यान विद्यापीठाच्या निर्देशानुसार सामाजिक समता सप्ताह निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत गावातील प्रमूख  चौकात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. गावातील लोकांना संविधानाचे महत्व आणि उपयोगिता पटवून देण्यात आली.गीत गायन आणि पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते.
      शिबीरसमारोपीय कार्यक्रमात प्रा.डॉ.राहुल निकम आणि प्रा.डॉ.संबोधी देशपांडे यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. शिबिरार्थीनी ग्रामस्थिती दर्शविणारे विविध नकाशांचे सादरीकरण केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, प्रा.डॉ. विष्णू गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. 
       शिबीर यशस्वीतेसाठी श्री.ज्ञानेश्वर भादले, सौ.वंदना भादले आणि आश्रमशाळेतील सर्व कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिबीर संयोजक म्हणून प्रा.डॉ.राहुल निकम, प्रा. डॉ.उत्तम सोनकांबळे, प्रा.डॉ. संबोधी देशपांडे यांनी कार्य केले. 
     प्रा.डॉ.विष्णू गुंजाळ, प्रा.डॉ.अनंत देशमुख, प्राचार्य डॉ.ईश्वर सौंदाणकर, उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी आणि सर्व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp