चोपडा तालुका रुखनखेडा प्र चो. येथे राशी सीड्स तर्फे पिक परिसंवाद .....
गेल्या दोन वर्षापासून बदलत्या लाहरी व ऋतूचक्रा मुळे कपाशीच्या उत्पादनात घट होत असून कापूस पिका बाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येते त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही शेतकऱ्यांना योग्य कपाशी पिकाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी राशी सीड्स नेपावले उचलली असून पीक परिसंवाद 6 एप्रिल रोजी रुखणखेडा येथे आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादांमध्ये शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत कपाशीचे उत्पादकता कशी वाढवावी जमिनीची सुपीकता कसे वाढवावे पेरणीचे अंतर खतांचे नियोजन बोंड आळी बोंड सड शोषण किडच्या नियोजनाबाबत राशी सिडस चे डिव्हिजनल मॅनेजर श्री मिलिंद चव्हाण रिजनल बिजनेस मॅनेजर श्री जितेंद्र खर्चे रिजनल क्राप मॅनेजर श्री उल्हास पाटील टेरिटरी मॅनेजर श्री अमोल बोरसे तसेच राशी सीड्स सेटचे खान्देश टीम यांनी वेगवेगळ्या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत राशी सीड्स चे ब्रीद वाक्य आहे त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना माहिती वेळोवेळी मिळावी यासाठी परिसंवादाच्या श्रृंखला चालू हंगामातही सुरू राहील या परिसंवाद कार्यक्रमाच्या पंचक्रोशीतील 25 गावातील 400 शेतकऱ्यांनी व विक्री त्यांनी लाभ घेतला कार्यक्रमासाठी राशी सीड्स खान्देश टीमने परिश्रम घेतले व राशी मित्र यांनी सहकार्य केले.

No comments:
Post a Comment