आज चोपडा तालुक्यात आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आला .... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/04/2022

आज चोपडा तालुक्यात आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आला ....

चोपडा (प्रतिनिधी) :--
   आज चोपडा तालुक्यात आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आला .... 
   आज दि. 16 /4 /22 रोजी आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी दिवस 14 एप्रिल 2022 रोजी चार वर्ष पूर्ण झाल्याचा निमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 16 एप्रिल रोजी आरोग्यवर्धिनी दिवस साजरा करण्यात आलाा.
    आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रम हा केंद्र शासनाचा  एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. टेली कन्सल्टेशन च्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा  देण्याच्या उद्देशाने व रुग्णांना आरोग्यवर्धिनी सेवेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने आरोग्यवर्धिनी दिवसाचे आयोजन माननीय पंतप्रधान व  केंद्रीय आरोग्य मंत्री माननीय  व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी संपूर्ण देशातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी  व रुग्णांशी संवाद साधून आरोग्य विषयक सेवा सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध होतात हे जाणून घेतले व यापुढे रुग्णांना दर्जेदार व वेळेत आजाराचे निदान, औषधोपचार गावपातळीवरील उपकेंद्र स्तरावर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात याला. आरोग्यवर्धिनी दिनाच्या निमित्ताने जनजागृतीपर कार्यक्रम देश पातळीवरून घेण्यात आला आहे .
    सदर कार्यक्रमात चोपडा तालुक्यातील 07 आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व 30 आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सहभागी झाले. तालूक्यातील अडावद, चहार्डी, धानोरा, गोरगावले,हातेड,लासूर व वैजापूर   या प्रा आ केंद्रात योगा, NCD, इ-संजीवनी ओपीडी घेण्यात आली .तसेच उपकेंद्रांचे ठिकाणी रूग्णांची मधुमेह, उच्चरक्तदाब या आजारांची तपासणी , ऊपचार ,सल्ला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून रुग्णांचे समुपदेशन व योगा कार्यक्रम घेण्यात आला. यात सर्व रूग्ण व नातेवाईकाचे  सहकार्य लाभले. 
    सदरचा कार्यक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 
     सदर कार्यक्रमा आरोग्य विभागाचे सर्व आरोग्य कर्मचारी , आशा, गटप्रवर्तक ,वैद्दकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी,तसेच तालुका आरोग्य अधिकारी  सर्वानी मोलाचे परिश्रम घेतले.असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी सांगितले  ...

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp