कोळंबा वडगाव शिवारात बिबट्याचा हैदोस .... प्रतिबंध करावा..... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

11/04/2022

कोळंबा वडगाव शिवारात बिबट्याचा हैदोस .... प्रतिबंध करावा.....

चोपडा(प्रतिनिधी) :--
    कोळंबा वडगाव शिवारात बिबट्याचा हैदोस .... प्रतिबंध करावा.....
     चोपडा तालुक्यातील मौजे कोळंबा वडगावसिम शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून आता तर गावाजवळून बकरी,म्हशीचे पारडु,कुत्रे उचलुन घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी, शेतमजूर, गुराखी,शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ह्या परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा,अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
      विशेष असे की वडगावसिम येथील पितांबर भिल यांचे शेळीचे पिल्लु व कोळंबा हायस्कूल जवळील एका खळ्यातून कुत्रा व म्हशीचे पारडु बिबट्याने उचलून नेल्याचे बाळू देवराम कोळी यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.शेतकरी अंबादास कोळी हे पिकाला पाणी भरतांना समोरच बिबट्या दिसल्याने त्यांनाही काम सोडावे लागले. एका शेतात मका खुडण्याचे काम करत असताना त्यांच्यासमोरून बिबट्या गेल्याने मजुरांना घरी निघुन जावे लागले. काही गुराख्यांना सुद्धा बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने येथील दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत.वडगावसिम येथून शाळकरी मुले कोळंबा येथे जातात.परंतु बिबट्याच्या धाकाने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत अशा परिस्थितीत बिबट्याला पकडण्यासाठी येथील ग्रामस्थं व शेतकरी सहकार्य करण्यास तयार आहेत.त्या करिता संबंधित विभागाने त्वरित उपाय योजना करावी, अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp