देवझिरी आश्रम शाळेत ग्रामीण शिबीर उत्साहात संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

12/04/2022

देवझिरी आश्रम शाळेत ग्रामीण शिबीर उत्साहात संपन्न ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
     देवझिरी आश्रम शाळेत ग्रामीण शिबीर उत्साहात संपन्न ...
     कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागातर्फे ग्रामीण शिबीर आयोजित करण्यात आलेले असून ग्रामीण शिबिराचे उद्घाटन मा.श्रीमती विनिता ताई सोनवणे प्रकल्प अधिकारी सो एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील चौधरी सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री डी बी सोनवणे सर समाजकार्य विभाग प्रमुख तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते 
     कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री.डी बी सोनवणे सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली.
       महापुरुषांच्या कार्यातून समस्त मानवजातीला सदैव प्रेरणा मिळते. महापुरुषांच्या विचारातून प्रचंड लोकसेवेचा ध्यास या गोष्टी समाजाने स्वीकारण्यासारख्या आहेत. अशा विचारांची आजच्या युवा पिढीला नितांत गरज आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुनिल चौधरी (मुख्याध्यापक) आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आजच्या युवापिढीने गत काळातील उज्वल इतिहासाची उजळणी करावी व प्रेरणादायी विचार आत्मसात करून मार्गक्रमण करायला हवा. कोणत्यातरी ध्येयाने पेटून उठून कार्यरत झाल्या शिवाय आपल्या इच्छित उद्दिष्टांपर्यंत पोचता येत नाही, हीच गोष्ट आजच्या तरुणाईने महापुरुषांकडून शिकायला हवी.
     या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp