राज मोहम्मद खान शिकलगर " खान्देश प्रेरणा पुरस्काराने " सन्मानित ....
आज जळगाव अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव तर्फे कॅन्सर ला कॅन्सल करून आपले भावी आयुष्य व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियानात समर्पित करणारे व या अभियानाचा माध्यमातून जळगाव जिल्ह्याला राज्यात नावलौकिक मिळून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे राज मोहम्मद खान शिकलगर याना त्यांची जिद्द बघून आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदाना बद्द्ल " खान्देश प्रेरणा पुरस्कार " महापौर जयश्री महाजन यांचा प्रमुख उपस्थितीत व मनोज पाटिल व मान्यवरांचा उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या वेळी जिल्ह्यातील इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकाना ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सदर पुरस्कार सोहळ्याला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment