प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे उन्हाळी क्रीडा शिबिराचे दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन संपन्न..
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित, प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे शालेय क्रीडा विभागाच्या वतीने दरवर्षा प्रमाणे या वर्षी देखील दिनांक 18 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिराला नवचैतन्य असे नामकरण करण्यात आलेले असून 18 तारखेला विद्यालयाच्या भव्य मैदानावर संस्थेच्या सन्माननीय सचिव माधुरीताई मयूर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दिमाखदार सोहळ्यात शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंनी संचलन करून मान्यवरांना मानवंदना देऊन यांच्या हस्ते विद्यालयाचे ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधत शिबिरा साठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिरामध्ये खेळाडूंना योग साधना, सूर्यनमस्कार, हॉलीबॉल, कबड्डी, घोडेस्वारी, रायफल शूटिंग व कराटे या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून 25 तारखेला वैजापूर येथील वनपरिक्षेत्रामध्ये एक दिवसीय ट्रेकिंग कॅम्पचे वनभोजनासह आयोजन करण्यात आलेले आहे. शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर, सदस्य योगीभाई मयूर, मुख्याध्यापक आर.आर. शिंदे, समन्वयक गोविंदभाई गुजराती, उल्हासभाई गुजराती तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस.जी.डोंगरे, पर्यवेक्षिका माधुरी पाटील उपप्राचार्य शेलार आदींची उपस्थिती होती. सदर शिबिराचे प्रास्ताविक विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख एस.एस. पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक नरेंद्र महाजन यांनी केले.या शिबिरासाठी क्रीडाप्रेमी समाधान माळी सर, विद्यालयाचे माजी खेळाडू चेतन माळी, प्रथमेश शिंदे, हर्षवर्धन पवार, शुभम साळी, दिव्येश पाटील, जय पाटील, प्राजक्ता पाटील, सृष्टी बडगुजर, ऋतुजा पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment