जि.प. शाळा वडती येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

19/04/2022

जि.प. शाळा वडती येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न ...

चोपडा (वडती प्रतिनिधी) जितेंद्र कोळी  : --
     जि.प. शाळा वडती येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न ...
   चोपडा तालुक्यातील जि.प. शाळा वडती येथे दि:- 19-एप्रिल - 2022 रोजी शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न करण्यात आला प्रथमता सरस्वती माताचे प्रतिमेला पुष्पहार व पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच नवीन पहिल्या च्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवावे, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून रोज काही वेळ आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी घरी देखील द्यावे अशी देखील पालकांना विनन्ती केली
     चला आता मग मुलांसोबत मिळुन काम करुया आणि त्यांची शाळा पुर्व तयारी पक्की करुया अशी देखील घोषणाबाजी केली या वेळी  (ग्रा.प सदस्य)  (युवा कार्यकर्ता), मुख्याध्यापक, शिक्षक व अंगणवाडी सेविका,  पालक, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते..
      शाळेत नवीनच प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना शब्द ओळख, परिसर ओळख, चित्राचे बिंदू जोडणे, बडबड गीते आदी संकल्पनांपासून वंचित राहावे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या वयाच्या निकषानुसार त्यांना आता नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार नसून थेट पहिलीमध्येच प्रवेश घ्यावा लागणार आहे.या विद्यार्थ्यांचे पहिलीपासून सुरू होणारे शिक्षण सहज, सुलभ व सोपे होणे अपेक्षित आहे. जेणेकरून त्यांना शिक्षणाची भीती वाटता कामा नये, तसेच त्यांची मानसिक तयारी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळापूर्व तयारी व्हावी यासाठी शालेय शिक्षकाकडून शाळापूर्व तयारी अभियान उपक्रम हाती घेतला आहे. शाळापूर्व तयारी अभियानात दोन टप्पे असून पूर्व प्राथमिक शिक्षणातील भाषा, गणित, परिसर विकास आदी विषयांसह विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
     जि.प. शाळा वडती येथील शालेय शिक्षकाकडून शाळापूर्व तयारी अभियान उपक्रम राबविण्यात आला,

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp