अवैधरित्या गौणखनिज चोरटी वाहतूक प्रकरणी वनविभागाची कारवाई शुन्य.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

14/04/2022

अवैधरित्या गौणखनिज चोरटी वाहतूक प्रकरणी वनविभागाची कारवाई शुन्य....

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :-- कैलास कोळी
     अवैधरित्या गौणखनिज चोरटी वाहतूक प्रकरणी वनविभागाची कारवाई शुन्य....
     मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रात वनहद्दीतील खडीची तथा मुरुमाची चोरटी वाहतूक करुन रस्त्याच्या कामात वापर केल्याप्रकरणी वनविभागाकडुन संबंधित वनरक्षकाचे  तात्काळ निलंबन करण्यात आले. मात्र वनहद्दीतील महाराष्ट्र शासनाने दुष्काळजन्य काळात सन,१९७२सालातील दुष्काळामध्ये मजुरांकडून तयार केलेली लाखों ब्रास खडी तयार केलेली होती आणि तिच खंडी व मुरुम अवैधरित्या वाहतूक करून पंतप्रधान ग्राम सडक योजना रस्त्याच्या कामात वापरल्याबाबत संबंधित ठेकेदारावर अद्यापपर्यत कोणत्या च स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने वनविभागाच्या कार्यप्रणाली वर संशय व्यक्त होत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये पिंप्रिपंचम नियतक्षेत्राच्या वनहद्दीत घडलेल्या या वनगुन्ह्याबाबत मौजे पिंप्रिपंचम गावातील एका नागरिकांने घटनास्थळी मुरुम वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे फोटो काढुन याबाबत तक्रार केली होती.सदर प्रकाराची तातडीने दखल घेऊन उपवनसरंक्षक विवेक होसिंग यांनी चौकशी करुन याबाबत दोषी आढळल्याप्रकरणी फक्त वनरक्षक वनारसे यांच्यावर  निलंबनाची कारवाई केली. तसेच मुरुमाची चोरटी वाहतुक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा नोंदविला खरा पण मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आली नसल्याने वनविभागाकाच्या कार्यप्रणाली वर संशय व्यक्त केला जात आहे. 
    मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाटा ते रामगड वस्ती दरम्यान प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतुन सुमारे साडेचार कि.मी डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आले.रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरुम व खडी काही प्रमाणात जवळील वनहद्दीतुन चोरटी वाहतूक करुन वापरण्यात आला होता.या प्रकाराबाबत एका नागरिकाने घटनास्थळावरुन वाहतुक सुरु असतांनाचे ट्रॅक्टरांचे फोटो घेऊन वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती.या तक्रारीची दखल घेत उपवनसरंक्षक विवेक होसिंग यांनी घटनास्थळी चौकशी करुन याबाबत दोषी वनरक्षक वनारसे यांचे तात्काळ निलंबन करत मुरुम चोरीप्रकरणी वनगुन्हे दाखल केले.मात्र सहा महिने उलटल्यानंतर देखिल संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही.तसेच वाहने जप्तीचीही कारवाई करण्यात आली नसल्याने वनविभागाकाच्या कार्यप्रणाली वर संशय व्यक्त केला जात आहे.या मध्ये प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार  झाल्याचे मुक्ताईनगर तालुक्यात दबक्या आवाजा मध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते ,संबंधित वाहने जप्त करुन आरोपींवर  फॉरेस्ट ऍक्ट नुसार कारवाई होणे अपेक्षित असल्यांचे वन्यप्रेमी तसेच सुज्ञ नागरीकांकडुन अपेक्षा होत आहे.
-------------------------------------------------------------------
    मुक्ताईनगर तालुक्यातील कर्कीफाटा ते रामगड वस्ती साठी सुमारे साडे चार कि.मी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना रस्त्याचे काम करण्यात आले.रस्त्यासाठी लागणारे मटेरियल खडी व मुरूम वडोदा वनक्षेत्रातील अवैधरीत्या वापरल्यामुळे त्याला जबाबदार असणारे कु-हा वनक्षेत्रपाल व वनपाल आणि वनरक्षक तसेच वनमजूर आणि संबंधित ठेकेदार हे सर्वजण या घटनेला जबाबदार आहेत. मात्र वनरक्षक का वरच कारवाई का? वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल याच्यावर कारवाई का नाही?याबाबत वन विभागाच्या बाबतीत उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे समजते.या मध्ये खूप मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलल्या जात आहे.मग हा भ्रष्टाचार नाही का? भ्रष्टाचारी असलेल्या कडेच तपासकार्य देण्याची मागचे कारण काय? या घटनेची चौकशी करणारे उपवनसंरक्षक श्री विवेक होसिग तपास अधिकारी असणे गरजेचे असताना यांनी तपास श्री पी, टी पाटील वनपाल जे या प्रकरणात दोषी आहेत असे अधिकारी यांच्याकडे का तपास दिला. यांच्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.यासर्व प्रकरणा बद्दल मुक्ताईनगर तालुक्यात दाबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
-------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp