तांदळवाडी हायस्कूलला विविध उपक्रमांनी / स्पर्धांनी डॉ.आंबेडकर जयंती साजरी...
भगवान महावीर जयंती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी येथे विविध उपक्रम घेण्यात आले. शासन निर्देशानुसार इ.५वीसाठी चित्रकला उपक्रमांतर्गत डॉ. आंबेडकर चित्र रंगभरण, इ.६वी ते आठवीच्या गटासाठी निबंधलेखन,डॉ.आंबेडकरां वरील काव्यवाचन,वक्तृत्व, रांगोळी,
डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगकथन अशा विविध स्पर्धा - उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात काव्यवाचन स्पर्धेत गुणवंत रमेश पाटील ( प्रथम ) जान्हवी प्रशांत पाटील ( द्वितीय, नेहा रंगराव बाविस्कर ( तृतीय ) यांनी तर रांगोळी स्पर्धेत धनश्री गंगाधर व रोशनी रवींद्र धनगर(प्रथम ), भुवनेश्वरी रामकृष्ण धनगर ( द्वितीय ) ऋतुजा जयवंत पाटील ( तृतीय ) यांनी तसेच रमेश सेवाली, रोशनी गोपाल पाटील, नेहा विश्राम सपकाळे, गायत्री अनिल पाटील,विजया गजानन सपकाळे, शीतल आनंद वैदू, तेजस्विनी सुनिल कोळी, कोमल दिलीप बाविस्कर, राजेश्वरी प्रल्हाद बाविस्कर यांनी वेगवेगळ्या गटातून निबंध स्पर्धेत पारितोषिकं प्राप्त केली.
तसेच वर्षा शिलसिंग बारेला, शिवानी नाना बारेला, योगिता गजानन बाविस्कर, जागृती अमोल भिल, वृशाली रवींद्र धनगर, वर्षा हिरालाल बारेला, वर्षा किशोर धनगर, दीपक नामदेव बाविस्कर यांनी ही ५वी तसेच, ६वी ते ८वी गटातून चित्ररंग भरण स्पर्धेत पारितोषिकं पटकावली. या स्पर्धांचे परिक्षण - कला शिक्षक नरेंद्र पी. पाटील, संदीप प्र. लांडगे व मुख्या.विलास पं. पाटील यांनी केले. या शासन निर्देशीत विविध उपक्रमां मागील शासन भूमिका मनोगत स्वरूपात, काव्यवाचनाद्वारे मुख्या. विलास पं. पाटील यांनी मांडली.

No comments:
Post a Comment