स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांच्या लढ्याला यश ...
मुक्ताईनगर शहरवासियांना पाणीपुरवठा करणार्या उघड्या टाकीवर अखेर टाकला स्लॅब ...
मुक्ताईनगर शहरवासियांना पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी ही १९७८ पासून कार्यरत असून ४४ वर्षात अत्यंत जीर्ण होऊन या टाकीचे छत पूर्णपणे कोसळलेल होते स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांच्या मागणीच्या अनुषंगाने या उघड्या टाकीवर नवी स्लॅब टाकण्यात आला.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी मुक्ताईगर न.प.च्या मार्फत शहरवासियांना होणार्या दूषित पाणी पुरवठ्याच्या ढिसाळ कारभारा विरूध्द शासनाकडे वारंवार तक्रारी करून आंदाेलन मोर्चे काढून या उघड्या टाकीत भटके जनावरं पडून मरत असल्याचा वारंवार निषेध नोंदविला त्याच मागणीच्या अनुषंगाने पाण्याच्या टाकीवर चढून केलेले "शोले स्टाईल" आंदोलन हा परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. या उघडय़ा पाण्याच्या टाकीवर स्लॅब टाकून शहरवासीयांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली.
त्याचं मागणीच्या अनुषंगाने मुक्ताईनगर शहरवासियांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या उघड्या टाकीवर स्लॅब टाकण्यात आला. त्यांच्या या आंदोलनाच्या यशाबद्दल स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांचे मुक्ताईनगर शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment