मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शेळके यांचा हातभट्ट्या उध्वस्त करण्याचा निश्चय ...
थेरोळा शिवारात दोन भट्ट्या उध्वस्त ...
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी अवैध दारू विक्रीकडे आपला मोर्चाची वाटचाल केली असून आज सकाळी थेरोळा शिवारातील हातभट्ट्या उध्वस्त करुन एका आरोपीस अटक केली.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या थेरोळा शिवारात खूप मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्ट्या सुरु असल्याची चाहूल पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना लागली असावी. त्यांनी आपले स्तरावर पथक तयार करून सकाळी पाच ते साडे सहाच्या सुमारास थेरोळा शिवारात धडक मारली असता. संशयित ईश्वर बाळू बेलदार (रा. थेरोळा ता. मुक्ताईनगर) हा गावठी दारू गाळत असल्याचे त्यांना आढळून आल्याने त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातील ७५ हजार किमतीचे गुळ मोह मिश्रित कच्चे रसायन, १८ हजार किमतीचे उकळते रसायन, दहा हजार पाचशे किमतीची तयार दारू आणि एक हजार पाचशेचे साहित्य असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या हात भट्टी कडे मोर्चा वळवला. त्या ठीकाणी महादेव जग्गू बेलदार (रा. थेरोळा ता. मुक्ताईनगर) हा इसम त्याच्याच शेतात गावठी दारू गाळण्याचे सामान आढळून आले. त्यात ३७ हजार पाचशेचे गुळ मोह मिश्रित कच्चे रसायन आणि दोन हजार किमतीचे भट्टी साठी लागणारे साहित्य असा ३९ हजार पाचशेचा मुद्देमाल आढळून आला. संशयित महादेव बेलदार फरार आहे. दोघा संशयितांकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही हातभट्ट्या आणि सदर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. या कारवाईने अवैध दारू विकेत्यांचे धाबे दणाणले असून या कारवाईत पो .नि. शंकर शेळके यांच्या नेतृत्वात पिएसआय राहुल बोरकर, पिएसआय प्रदीप शेवाळे, पोलीस नाईक प्रदीप इंगळे, पो. कॉ. सागर सावे, संभाजी बिजागरे, राहुल नावकर, गोपीचंद सोनवणे, रविंद्र धनगर, पोलीस पाटील समाधान भोंबे यांनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment