उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल सादरीकरणासाठी डॉ. कुणाल पवार व शरद धनगर यांना निमंत्रित… - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

13/04/2022

उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल सादरीकरणासाठी डॉ. कुणाल पवार व शरद धनगर यांना निमंत्रित…

अमळनेर (प्रतिनिधी) :-- पंकज पाटील 
    उदगीर येथील ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल सादरीकरणासाठी डॉ. कुणाल पवार व शरद धनगर यांना निमंत्रित…
     उदगीर येथे होऊ घातलेल्या "९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात" जळगाव जिल्ह्यातून डॉ. कुणाल पवार व शरद धनगर या युवा गझलकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. करणखेडा ता. अमळनेर येथील गझलकार शरद धनगर व लोंढवे ता. अमळनेर येथील डॉ. कुणाल पवार यांची साहित्य संमेलनात गझलकट्टयावर होणाऱ्या मराठी गझल मुशायऱ्यात गझल सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनात साधारण १० गझल मुशायरे दोन दिवसात होणार असून याबाबत निमंत्रण पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. दि.२२एप्रिल ते २४एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील उदगीर येथे संमेलन होणार आहे. शरद धनगर हे मराठी अहिराणी व हिंदी भाषेतून कवी व गझल लेखन करतात ते प्रसिद्ध युवा गझलकार असून आपल्या कविता व गझलांच्या माध्यमातून जळगांव जिल्हाचं प्रतिनिधित्व करतात.एक सामान्य शेतकरी असून ते उत्तम गझलकार म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.तर डॉ. कुणाल पवार हे ढेकू ता.अमळनेर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असून ते उत्तम लेखक, कवी व गझलकार म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचे दोन कविता संग्रह पुढील महिन्यात प्रकाशित होत आहेत. मागील वर्षी देखील त्यांना नाशिक येथील संमेलनात निमंत्रित केले होते. दोघांच्याही निवडीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp