अडावद येथे संविधान जागर कार्यक्रम संपन्न ...
भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या क्षेत्र कार्य अंतर्गत एम एस डब्ल्यू भाग 2 च्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत संविधान जनजागृती साठी संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजन मंगरूळ ,अडावद या ठिकाणी क्षेत्र कार्य अंतर्गत करण्यात आले. मूलभूत हक्क व मूलभूत कर्तव्य यासंबंधी क्षेत्र कार्य पर्यवेक्षक डॉक्टर विनोद रायपुरे व क्षेत्र कार्याची विद्यार्थी यांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अडावद येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी संविधानाची माहिती व संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य याविषयी येथील वस्तीत जागृती पर कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये संविधानाच्या संदर्भात तसेच मूलभूत हक्क व कर्तव्य यासंदर्भातील माहिती देऊन माहिती चे वाटप लिखित स्वरूपात करून वाचन सुद्धा करण्यात आले सदर कार्यक्रमाला अडावद येथील ग्रामपंचायत सदस्य विजय छन्नू साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसरातील युवक व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता एम एस डब्ल्यू द्वितीय वर्गातील पूजा महाजन, राजनंदिनी शिरसाट ,सागर महाजन पूजा मोरे किरण कोळी व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment