प्रा. एन्. टी. चौधरी यांचे निधन ... शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आवाज हरपला ... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

15/04/2022

प्रा. एन्. टी. चौधरी यांचे निधन ... शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आवाज हरपला ...

चोपडा (प्रतिनिधी) :--
          प्रा. एन्. टी. चौधरी यांचे निधन...
      शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आवाज हरपला...
      मुळगाव तावसे बू!! ता चोपडा व नोकरीस रोहा तालुक्यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कूल नागोठणे या शाळेत कार्येरत असलेले अभ्यासू भौतिकशास्त्र विषयाचे महाविद्यालयीन शिक्षक प्रा. निंबा तुळशीराम चौधरी याचे पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे मूळ गाव तावसे बु!! चोपडा जि. जळगाव असून ते जून १९९६ पासून नागोठणे या शाळेत भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन करत होते. त्यांची जन्मतारीख ५ सप्टेंबर १९६५ हा शिक्षक दिन असून विहित नियमानुसार ते सप्टेंबर २०२३ मध्ये निवृत्त होणार होते परंतु त्या आधीच १४ एप्रिल  डॉ. आंबेडकर जयंती दिनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. रिलायन्स फाऊंडेशन स्कूल आणि पंचक्रोशीत प्रा. चौधरी हे अतिशय अभ्यासू व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रख्यात होते. विद्यादानाबरोबरच ते वारकरी संप्रदाय, स्वाध्याय परीवार या सर्वांमध्ये ते अभ्यासू अध्यात्मिक प्रवचनकार म्हणून ही सुपरिचित होते. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, हरिपाठ, दासबोध इत्यादी ग्रंथाबरोबरच आधुनिक साहित्याचा ही त्यांचा गाढा अभ्यास होता.
       शिक्षक म्हणून काम करत असताना कुठेही शिक्षकांवर अन्याय झाला की धावून जाणे हा सरांचा स्वभाव होता. विद्यापीठ आयोग, मुदलीयार आयोग, १९८६ चे नवे शैक्षणिक धोरण ,१९८१ चे शिक्षक संहिता तसेच वेळोवेळी निघणारे शिक्षण खात्याशी संबंधित जी आर सरांच्या तोंडपाठ असत. शिक्षकाच्या प्रश्नावर सर नेहमीच पोटतिडकीने बोलत व शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत. शिक्षकांच्या प्रश्नांवर लढणारा शिक्षकांचा आवाज आज आसमंतात कायमचा विरल्याने अनेक शिक्षकांना अश्रू अनावर झाले. 
     प्रा. एन टी चौधरी व प्रा. एल टी चौधरी या दोघे बंधूंनी चोपडा शहरांतील गुजरअळी भागात सर्वप्रथम कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अल्पावधीतच दोघे बंधूं विदयार्थी प्रिय झालेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा ठसा आपल्या ज्ञान दानातून उमटविला. परंतू नंतर दोघे बंधू नोकरीच्या निमित्ताने नागोठणे येथे स्थायिक झाले. गावापासून कोसो दूर अंतरावर देखील त्यांनी आपल्या ज्ञानशिलतेची छाप पाडली. आज समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रा. एन टी चौधरी यांना कायम स्मरणात ठेवेल.
      पेण, रोहा, ठाणे, नवी मुंबई, जळगाव, पुणे येथून त्यांच्या परिचित शिक्षक व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने हजर होते.
           💐 💐  भावपूर्ण  श्रद्धांजली   🌹🌹

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp