सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर येथे राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धांसाठी निवड चाचणी उत्साहात संपन्न....
लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, अमळनेर शहरातील सी.बी.एस.ई. सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल,मंगरूळ येथे जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी असोसिएशन, जळगाव यांचा मार्फत राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धांसाठी निवड चाचणी घेण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा व शिक्षक रामचंद्र मोहन्ती, भास्कर पाटील तसेच क्रिडा शिक्षक सचिन वाघ व यज्ञेश जगताप यांनी डॉ. जिगारो कानो आणि आर.डी. खणीवाले यांचे प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेची सुरुवात केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी सर्व खेळाडूंना दैनंदिन जीवनात खेळाचे महात्व पटवून दिले. सर्व सहभागी खेळाडूंना क्रीड़ा शिक्षक सचिन वाघ व यज्ञेश जगताप यांनी स्पर्धेचे नियम सांगून स्पर्धेचे पंच म्हणुन काम पाहिले.
मुलांना मध्ये हर्षल पाटिल - 55 , वैभव पाटिल - 60 , देवर्षी सोनवणे - 66, चेतन गोरे -73 , पवन शिंपी - 81, क्रिष्णा साळवी - 90 तर मुलींन मध्ये कल्पना गायकवाड - 44 , कृणाली पाटील - 48 , वैष्णवी गुरव - 52 , माया झाडे - 63 , ज्योती यादव - 70 यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पंकज पाटील यांनी केले तर आभार क्रिडा शिक्षक सचिन वाघ यांनी मानले.
@ हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा @

No comments:
Post a Comment