विवेकानंद विद्यालयाचे 9 विद्यार्थी
N. M. M. S. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकले ...
चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती मिळाली त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती चार वर्षापर्यंत प्राप्त होणार आहे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला 48000 रुपये प्रमाणे शिक्षणासाठी शासनातर्फे शिष्यवृत्ती प्राप्त होईल. त्यांची नावे पुढील प्रमाणे चेतन जितेंद्र चौधरी , तन्मय शैलेंद्र सूर्यवंशी , चेतन कमलाकर चौधरी , युगल सुखदेव पाटील , चेतन तुकाराम पाटील , दुर्वेश महेश पाटील , जान्हवी नेताजी पाटील, विनीत प्रकाश पाटील , उत्कर्ष प्रदीप कंखरे
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर,उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ. विनीत हरताळकर , मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद , कर्मचारीवृंद, पालकवृंद व विद्यार्थी यांनी केले.

No comments:
Post a Comment