जागर . . . “ चिमणी संवर्धनाचा ”
20 मार्च - जागतिक चिमणी दिवस विविध कृती उपक्रमांनी उत्साहात साजरा.
सर्वत्र होत असलेले वाढते शहरीकरण , दिवसेंदिवस प्रदूषण पातळीतील वाढ , उन्हाळ्यातील असह्य तापमान , वृक्षतोड , मोबाईल टॉवर्स , पिकांवरील अतिघातक रसायनांची फवारणी , नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास इ. सारख्या अनेक कारणांनी चिमणी व परिसरातील सामान्य पक्ष्यांची संख्या गेल्या दोन - तीन दशकांपेक्षा जास्त कालावधी पासून रोडावत चालली आहे. पक्षी हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक व वसुंधरेचे अलंकार आहेत. त्यांचे संवर्धन व संरक्षण खूप महत्त्वाचे आहे , या विचाराने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी पक्षी , वन्यजीव व वन संवर्धनासाठी कार्यरत असलेले वन्यजीव अभ्यासक श्री हेमराज पाटील यांनी जागतिक चिमणी दिवस निमित्त विवेकानंद विद्यालयातील इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकात पक्ष्यांसाठी 216 पेक्षा अधिक जलपात्र व इको फ्रेंडली घरटे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील मोफत वितरित केले वआणखी वितरित केले जात आहेत.
या प्रबोधनपर कृती कार्यक्रमात मुख्याध्यापिका श्रीमती आशा चित्ते यांनी विद्यार्थ्यांना परिसरात आढळून येणाऱ्या चिमण्यांची माहिती , त्यांची दिनचर्या व महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जलपात्र लावण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना करून ते नियमित भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आग्रही केले उपमुख्याध्यापक श्री संजय सोनवणे यांनी गोष्ट रुपात पाठ्यपुस्तकातील पक्षी व निसर्ग विषय घटकातून प्रबोधन पर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन चिमणी प्रगणनेची लिंक भरण्यासाठी आवाहन केले. इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थ्यांनी पक्षी विषयक बडबड गीते सादर केलीत.
श्री हेमराज पाटील यांनी प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना चिमणी दिवस साजरा करण्याची आवश्यकता , भारतात आढळणाऱ्या चिमण्यांचे प्रकार , चिमणी व सामान्य पक्षी संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजना , बर्ड रेस्क्यूसाठी संपर्क करणे इ. विषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा म्हणवून घेतली. तसेच 22 एप्रिल ला जागतिक वसुंधरा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणातील विविध घटक , वसुंधरा संवर्धनासाठी दैनंदिन जीवन शैलीतील बदल इत्यादी विषयी प्रोजेक्टवर माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक श्री एम एन बारेला , सौ शुभांगी बोरसे यांचे विशेष सहकार्य लाभले. विभागातील सर्व अध्यापकांनी शाळेतील उद्यानात पक्षी जलपात्र लावून उपक्रम यशस्वीतेचा निर्धार केला. अभिनव उपक्रमासाठी संस्थेचे व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
20 मार्च जागतिक चिमणी दिवस ते 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन , दरम्यान सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेकडून तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांसाठी ऑनलाइन स्वरूपात चिमणी प्रगणना घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रगणनेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील कालावधीतील चिमणी संवर्धन कार्याला मार्गदर्शन मिळाले आहे. अविरत कार्यरत असलेल्या सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे सर्व स्तरातून तसेच यावल व जळगाव वनविभाग , सर्व वनअधिकारी व कर्मचारी यांचेकडून आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक करण्यात आले. शहरातील काही भागात व वनक्षेत्राकडे लागून असलेल्या ग्रामीण भागात नागलवाडी , वैजापूर , देवझिरी येथे पक्ष्यांसाठी जलपात्र मोफत वितरित करण्यात आले. यासाठी सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेचे सदस्य अश्विनी पाटील , स्वप्निल नेवे , योगेश देवराज , आर्यदीप पाटील, देवेंद्र बि-हाडे , धनंजय बागुल , राहुल महाजन यांनी परिश्रम घेतलेत. पक्षी व वन्यजीव बचाव कार्य ,
अवैध वृक्षतोड व वणवा यासंबंधी माहिती देण्यासाठी स्थानिक पातळीवर 9922085434 व हॅलो फॉरेस्ट 1926 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. तसेच चोपडा तालुक्यातील मागेल त्या नागरिकास मोफत जलपात्र संपूर्ण उन्हाळ्यात मोफत वितरित करण्यात येणार आहेत. (कमाल मर्यादा 1008 जलपात्र.)

No comments:
Post a Comment