" दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील म्हणजे महात्मा गांधी समूहाचे साऱ्यांचे कुटुंब प्रमुखच नव्हे तर सर्वस्व होते " - - एस बी नाना पाटील.
जीवनातील आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय डॉ दादासाहेब यांचा आज लौकिकार्थाने तिसरा स्मृतिदिन असला तरी ते आपल्यात नाहीत यावर आमचा विश्वास नाही._
आजच्या काळात प्रत्येक माणूस दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवत आहे तो फक्त आणि फक्त काहीतरी स्वार्थासाठी व त्याचा उपयोग संपला की त्याच्याशी संबंध तोडायचे, अर्थात " युज अँड थ्रो " याला अपवाद होते आमचे दादासाहेब, हो अपवादच. सकाळी त्यांचा स्मृती दिवस त्यानिमित्त काही स्मृती जागृत झाल्यात.
सुरवातीच्या काळात जेव्हा दादा चोपड्याला आले व हॉस्पिटल सुरू केले त्या काळातील एक व्यक्तिमत्व मला आठवल ते म्हणजे "रूपा झाजोड" कारण म्हणजे त्यांचे काम ते काय दवाखान्यात स्वच्छतेचे धड बोलता ही यायचे नाही पण दादांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम. ते मूळचे राजस्थान मधील पण चोपडा येथे आलेत व दादांच्या सहवासात आलेत व त्यांचे झालेत. त्यानंतर दादांनी त्यांना कॉलेज ला स्वीपर म्हणून नोकरी दिली व त्यांची नेहमीची सोय केली. विशेष म्हणजे ते ज्या दिवशी रिटायर्ड झालेत त्या दिवशी दादासाहेब इतके भावूक झालेत व नेहमीच हसणारे दादा रडले , ते बघून सारे सहकारी स्तब्ध झालेत._
ऐन उमेदीच्या काळात दादासाहेबांच्या दवाखान्यात कामाला असणारे पण ज्यांना पेन्शन नावाचा प्रकार नव्हता, अश्या सहकाऱ्यांना म्हातारपणी खर्चासाठी, दादा जेव्हा त्यांना भेटायचे त्यांना त्यांच्या मिळणाऱ्या माजी आमदार चे पेन्शन मधून फुल ना फुलाची पाकळी द्यायचे. त्यांच्या कडून दादासाहेबांना ना राजकीय लाभ हवा होता ना दवाखान्यात काम, किती हे प्रेम एकतरी असे उदाहरण माझ्यातरी बघण्यात नाही.
बऱ्याच वेळेस ॲड संदीप भय्यासाहेब जेव्हा बाहेरगावी जायचे , तेव्हा दादासाहेब आवर्जून मला सांगायचे चल आपण कुठेतरी फिरून येवू. असेच एकदा नियोजन केले की गोवा जावू, त्याप्रमाणे आम्ही दादांची काळजी घेणारी सारी टीम घेवून गेलो .साऱ्यांना प्रश्न पडला दादासाहेबांनी संजुला गोवा जायला कसा होकार दिला. तेथे गेल्यावर आम्ही तेथील विविध मंदिरांना भेटी देत होतो,तेव्हा दादासाहेबांची मला म्हटले, अरे संजू ह्या साऱ्या पोरांना मंदिर फिरण्यात इंटरेस्ट नाही, त्यांना येथे चांगले पदार्थ खावू घाल, समुद्र किनारी फिरायला जावून आनंद घेवू दे, आपण बसू गप्पा मारत. तेव्हा साऱ्यां सहकाऱ्यांना कळले की दादासाहेब फिरायला जायचं ते त्यांना फिरायचे म्हणून नव्हे तर त्यांची काळजी घेणाऱ्यांना थोडा विरंगुळा मिळावा.
दादा नेहमी सांगायचे महात्मा गांधी शिक्षण मंडळ , कस्तुरबा महिला मंडळ व आदिवासी सेवा मंडळातील सारे सदस्य हे माझे कुटुंब आहे.त्यांच्या सुखदुःखात माझे सुख दुःख आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे एव्हढा सूक्ष्म विचार आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत करणारे व्यक्तिमत्व हे दुर्मिळ व निश्चित देवाचेच रूप असू शकते.
सध्या मी शेतकरी चळवळीत काम करीत असल्याने कोणत्या राजकीय पक्षात नाही. तरी परवा एकाने मला म्हटले नाना तुम्ही भलेही राजकारणात नाही, पण सारे तुम्हाला काँग्रेसचे म्हणतात, मला आनंद झाला की दादा असताना लोकांना मी त्यांचा वाटायचा तो एक सन्मान होता पण आता दादासाहेब नसतांना देखील तसे जर लोकांना वाटत असेल तर माझ्यासाठी तो एक सन्मान आहे. दादासाहेब यांना विनम्र अभिवाद

No comments:
Post a Comment