चोपडा महाविद्यालयात Jee Main परिक्षेतील गुणवंताचा सत्कार . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

01/05/2023

चोपडा महाविद्यालयात Jee Main परिक्षेतील गुणवंताचा सत्कार . . .

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         चोपडा महाविद्यालयात  Jee Main परिक्षेतील गुणवंताचा सत्कार 
          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी Jee Main 2023 परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ डी ए सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थांच्या सत्काराचे  आयोजन करण्यात आले. सत्कारार्थी मध्ये मिलिंद बोरसे (96•84) , निरंजन बाविस्कर (92•54) , महेश बाविस्कर (92•54) , निशु बाविस्कर ( 86•72) , कुणाल महाजन ( 86•30) , दिक्षा पाटील (85•33) , धवल सोनवणे (85•13) , राजदिप पाडवी (84•09) , ओम पोळ (83•85) , निलाक्षी बाविस्कर ( 83•25) , प्रथमेश पाटील (83•23) , वेदांत चौधरी (81•18) , आदिंचा समावेश होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. डी ए सूर्यवंशी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की Jee Main परीक्षेत दिवसें दिवस यश मिळवणार्यांचे प्रमाण वाढत असल्याने IIT , NIT , IIIT ला प्रवेशित होणारे विद्यार्थी वाढत आहे.
         अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष व गुणगौरव समारंभाचे अध्यक्ष अॕड.संदीप सुरेश पाटील म्हणाले की विद्यार्थी व पालक यांनी प्रवेश परीक्षा व बोर्ड परीक्षा यांची तयारी स्वयं अध्ययन , शिक्षकांचे मार्गदर्शन , हुशार विद्यार्थ्यां सोबत समुहचर्चा करून तणावविरहित वातावरणात तयारी करावी. महाविद्यालयाच्या समृद्ध ग्रंथालयाचा पुरेपूर लाभ घ्यावा. पालक विठ्ठल बोरसे यांनी मनोगतातून महाविद्यालय , संस्थाचालक व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
         या कार्यक्रमाचे प्रास्तविक उपप्राचार्य प्रा बी एस हळपे यांनी केले. प्रा शिरिन सैय्यद यांनी सूत्रसंचालन केले व प्रा पी एस पाडवी यांनी आभार मानले. कार्यकमास पर्यवेक्षक प्रा एस पी पाटील , समनवयक प्रा ए एन बोरसे , टी एस पिंजारी , पालक पंजाबराव बाविस्कर , संजय सोनवणे , प्रा डाॕ सविता सोनवणे , हुकूम बाविस्कर , सुनिता पाटील यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज