ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस' जल्लोषात साजरा - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

24/04/2023

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस' जल्लोषात साजरा

चोपडा (प्रतिनिधी) : - -
         ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 'इंग्रजी भाषा दिवस'  जल्लोषात साजरा
          चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ इंग्रजी लेखक, नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दिनांक 24 एप्रिल रोजी 'इंग्रजी भाषा दिवस' विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 
          कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावी च्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने  करण्यात आली. प्रमुख पाहुणे  एन. एस. सोनवणे आणि मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी मुळाक्षरांवर आधारित गाण्यावर नृत्य सादर केले. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुमधुर अशी इंग्लिश गीते सादर केली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विरुद्धार्थी शब्द आणि समोच्चारित शब्दांचा परिचय विविध कृतीतून करून दिला. अनोख्या शैलीत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून कथाकथन प्रस्तुत केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वन मिनिट अॕक्ट सादर केले. साभिनय आत्मकथनाचे आणि नृत्याचे सादरीकरण इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत संभाषणाचे आयोजन केले. आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी यशाचे मंत्र आणि सहाय्यकारी क्रियापदांची माहितीचे नाटिकेच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट आणि वर्किंग मॉडेल सादर केले. स्पेलिंग बी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
          या सर्व कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी पाटील, अमन पटेल, दीप्ती पाटील, दिपाली पाटील, प्राजक्ता सोनवणे, अश्विनी ढबू, पूजा चौधरी,भास्कर बाविस्कर, कामिनी पाटील व जुईली ठाकरे, या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंग्रजी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेतील कलाशिक्षक शकील अहमद यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. शाळेतील शिक्षक प्रदीप देवराज आणि सारिका पवार यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल, अश्विनी पाटील आणि दीप्ती पाटील  यांनी केले. आभार प्रदर्शन प्राजक्ता सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज