आमदार अनिल पाटील यांची कृषीमंत्रीकडे निवेदनाद्वारे मागणी ; कपाशी बियाणे विक्रीसाठी 15 मे पासून परवानगी द्या ~ ~ ~
आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्याच्या पदरी पडू नये यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास 15 मे पासुनच परवानगी द्यावी अशी मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मंत्री महोदयांना लेखी निवेदन त्यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की मा. सचिव सदस्य, जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रन समिती तथा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी जिल्हयातील सर्व विपणन अधिकारी / बियाणे वितरण / बियाणे विक्रेते, बियाणे कंपनी यांना उत्पादक कंपनी ते वितरण दिनांक 10 मे 2023 पासून पुढे, वितरक ते किरकोळ विक्रेते 15 मे 2023 पासुन पुढे किरकोळ विक्रेता ते शेतकरी 1 जुन 2023 पासुन पुढे असे कापसु बियाणे पुरवठा व वितरणाचे आदेश दिले आहेत. मात्र जळगांव जिल्हयात काही तालुक्यामध्ये पाणी पातळी चांगली असल्यामुळे बरेचशे शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे 15 मे पासुनच कापुस पिकाची लागवड करतात.

No comments:
Post a Comment