व्हॉइस ऑफ मीडियाच्या दिल्ली येथील राष्ट्रीय अधिवेशनात डॉक्टर शरीफ बागवान यांची राष्ट्रीय मीडिया समन्वयक पदी नियुक्ती . . .
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भारतातील सर्व राज्यातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकारी यांचा नियुक्ती समारंभ थाटामाटात पार पडला. व्हॉइस ऑफ मीडियाचे 28 हजार पत्रकार सभासद झालेले आहेत संघटनेला 2 वर्षांमध्ये चांगले यश मिळवून देण्याचे कार्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यानिमित्ताने दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक पत्रकार आमदार संजय राऊत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक कामरेट भालचंद्र कांगो वाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे उपाध्यक्ष फिरोज पिंजारी महिला संघटक सारिका महोतरा गगन महोतरा उर्दू विभाग राष्ट्रीय अध्यक्ष मुक्ती हारून नदवी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. शरीफ बागवान यांची व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटर पदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व ज्येष्ठ साहित्यिक कॉम्रेड भालचंद्र कांगो यांच्या हस्ते देण्यात आले.
डॉ शरीफ बागवान सामाजिक कार्यकर्ते यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्य संपूर्ण भारतामध्ये पसरवून भारताचा प्रत्येक गावातील प्रत्येक पत्रकाराला संघटनेशी जोडण्यात येईल व त्यांचे हक्कांसाठी लढा उभारण्यात येईल असे म्हटले ते डॉ शरीफ जळगाव मेहरून येथील बागबान विकास फाउंडेशन व अमन रोटरी फाउंडेशन चे अध्यक्ष , बी. वी न्युज 24 चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.
तसेच अनेक पद त्यांना मिळालेले असून भारतीय पत्रकार संघाचे सचिव . अखिल भारतीय जनरलीसट फेडरेशनचे नॉर्थ इंडिया सेक्रेटरी पोलीस मित्र संघटना चे महाराष्ट्र समन्वयक . महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित. राज्यस्तरीय मोलाना आजाद आदर्श समाज सेवक पुरस्कार संपादन केलेले व रोटरी क्लब ऑफ इंडिया चे पोलिओ डिस्ट्रिक्ट अवॉर्ड मिळालेले आहे. अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र स्टेट सेक्रेटरी, अखिल भातीय जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि अन्याय अत्याचार भ्रष्टचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष तसेच नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम चे जिल्हाध्यक्ष आहे.
आता त्यांना व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटर पद मिळाल्याने सर्व स्तरातील मित्र खलील सुर्वे, सुधीर माने, प्रकाश पाटील. आबिद अली सय्यद फरान शरीफ, डॉ संदीप सपकाळे, डॉ अतुल पाटील, एडवोकेट भूषण सूर्यवंशी, एडवोकेट योगेश वाणी. अजहर खान, नाझीम निसाfर. अश्फाक अलीम, अमीन निसार, समीर सलीम व व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकार यांनी त्यांचे कौतुक करून आनंद व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment