अबब ! ! ! 55 लाखाचा अपहार • • • सरपंच ; उपसरपंच सह ग्रा. पं. सभासदांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे ग्रामसेवकाची केली तक्रार - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

21/05/2023

अबब ! ! ! 55 लाखाचा अपहार • • • सरपंच ; उपसरपंच सह ग्रा. पं. सभासदांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे ग्रामसेवकाची केली तक्रार

चोपडा (प्रतिनिधी) : - -
           अबब  !  !  !  55 लाखाचा अपहार • • •
       सरपंच ; उपसरपंच सह ग्रा. पं. सभासदांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे ग्रामसेवकाची केली तक्रार ....
           चोपडा तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत उमर्टी येथील ग्रामसेवक वासुदेव पारधी यांनी ग्रामपंचायत मध्ये 55 लाखाचा अपहार केल्याचे दिसून आले. त्यात पेसा निधी तारीख 31 सप्टेंबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत, तसेच 14 वा व 15 वा वित्त आयोग , मानव विकास योजना अश्या विविध योजनाच्या निधीतून एकून 55 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचे आढळून आले.
          यात असे की परस्पर ग्रामपंचायतिचे खाते वापर करणे , घरी बसुन अथवा बाहेरून ग्रामपंचायतीचा कारभार हाताळणे , चुकीचे व बनावट बिले बनविणे , बनावट सह्याचा वापर करुन निधी हडप करणे , ग्रामपंचायत चे संपुर्ण दफ्तर घरी बसून गैरवापर करणे , अश्या प्रकारचे महापराक्रम करुन भ्रष्टाचार केल्याचे आढळून आले आहे.
          या झालेल्या प्रकारांबद्दल लोकनियुक्त सरपंच रीनेश पावरा यांनी खंत व्यक्त केली. यात खूप मोठा अपहार व भोंगळ कारभार ग्रामसेवक वासुदेव पारधी यांनी केलेला आहे. परस्पर ग्रामपंचायतिच्या सर्व खात्यांचे मालक बनणे , गावागावात एकमेकांचे भांडण लावणे , एकमेकांविरूद्ध भडकावून शांतता भंग करणे , तसेच गटविकास अधिकारी ही या प्रकरणावर वारंवार दुर्लक्ष करत आहे व अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहेत. सर्व मिलीभगत असून आर्थिक व्यवहारात ग्रामसेवकाला पाठीशी घातले जात आहे.
         याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी असे सर्व गावकऱ्यांसमोर व आमच्या प्रतिनिधी यांच्यासमोर सरपंच यांनी व्यक्त केली. यावेळी उपसरपंच संदीप सांगोरे यांनी एकूण निधीचा हिशोब वाचून दाखविला प्रोसेडिंग बुक कोरी पडलेली होती कोणतेच काम कायदेशिर केलेले आढळून आलें नाही यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी हजर राहून याविरुद्ध आवाज उठविला तसेच गावातली बहुसंख्य ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होते.
         तसेच शासन परिपञक क्रमाक व्हीपीएम - 2013 / प्र.क्र. 137/ पंरा. 3 दि. 12 जुन 2013 या परिपञकानुसार ग्रामपंचायतीत आर्थिक गैर व्यवहारात करने व मालमत्ता आथवा निधीचा अपहार करणे तसेच उमर्टी ग्रामपंचायतील मुळ दस्ताऐवजात खोट्या बनावट कागदपञाचा समावेश करणे
         अश्या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक व त्याला पाठीशी घालणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा व गावाचा विकासासाठी शासनाकडुन मिळालेला निधी देखील सदर ग्रामसेवका कडुन वसुल करण्यात यावा असे गावकरी , सरपंच व उपसरपंच त्यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज