निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याबाबत..... उर्वेश साळुंखे (जिल्हा सरचिटणीस - राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस , जळगाव ) यांनी पवार साहेबांना
" रक्ताने लिहिले पत्र "
चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी स्वतःचे रक्त काढून पवार साहेबांना पत्र लिहून साकळे घातले आहे.
आदरणीय पवार साहेब आपण आज जो निवृत्तीचा निर्णय घेतला तो निर्णय आम्हा युवकांसाठी खूप धक्केदायक आहे. जोपर्यंत आपण या सृष्टीवर आहात तोपर्यंत आपण अध्यक्ष पदावरून निवृत्त होऊ नका...
साहेब...... बाप कधी जबाबदारीतून निवृत्त होतो का? साहेब आम्हास युवकांना तुमच्या सारख्या भक्कम आधार - वडाची गरज आहे. तरी शरद पवार साहेब यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी आपल्या कळकळीची विनंती उर्वेश साळुंखे - जिल्हा सरचिटणीस , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस , जळगाव यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहुन केली आहे.

No comments:
Post a Comment