जळगाव जिल्ह्यातील न. पा. संचलित उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अखेर सुटला.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

18/05/2023

जळगाव जिल्ह्यातील न. पा. संचलित उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अखेर सुटला....

जळगाव (प्रतिनिधी) : ~ ~
        जळगाव जिल्ह्यातील न. पा. संचलित उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शिक्षकांच्या वेतनाचा तिढा अखेर सुटला....
       जुक्टो व S महाराष्ट्र 7 न्युज च्या पाठपुराव्याला यश . . .
          जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे वेतन माहे मार्च 2023 पासून निधी अभावी प्रलंबित होते. यासंदर्भात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेद्वारा मा. श्री. आर. एच. शर्मा साहेब (अधिक्षक वेतन पथक कार्यालय, माध्य.) व डॉ. नितीन बच्छाव साहेब (शिक्षणाधिकारी माध्य. जि.प.जळगाव), प्रा. डॉ. संजयजी शिंदे (राज्याध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ) यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सदर प्रश्नाला संघटनेद्वारा
S महाराष्ट्र 7 न्यूजच्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली होती.
           संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकतीच डि. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, मुन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर, आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या चारही उच्च माध्यमिक विद्यालयांच्या वेतनासाठी अत्यावश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली असून सोमवारी माहे मार्चचे वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असून माहे एप्रिल व मे महिन्याचे एकत्रित वेतन हे लवकरच अदा करण्यात येणार आहे.
         अशी माहिती जुक्टो अर्थात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा. सुनील सोनार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अतुल इंगळे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, प्रा. डी. डी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, प्रा. शैलेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिलेली आहे.
      या संपूर्ण लढ्यात S महाराष्ट्र 7 न्युजच्या सहकार्याबद्दल जुक्टो संघटनेद्वारा S महाराष्ट्र 7 न्युज चमूचे विशेष आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp