नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले. (जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन) - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

16/05/2023

नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले. (जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)

जळगाव (प्रतिनिधी) : - -
         नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे वेतन २ महिन्यांपासून रखडले.
       (जूक्टो संघटना छेडणार तीव्र आंदोलन)
           जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचलित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या माहे मार्च व एप्रिल 2023 चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. घरातील आजारपण, गृह कर्ज हप्ते, एलआयसी हप्ते अशा विविध समस्या असताना वेळेवर हप्ते न भरल्यास हकनाहक आर्थिक भुर्दंड शिक्षकांना सहन करावा लागत आहे.
         नगरपालिका संचलित डी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ, मुन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर, न. पा. संचलित आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा, नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल या चारही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे वेतन नियमित मिळत नसल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेद्वारा माध्यमिक वेतन पथक कार्यालयात वारंवार संपर्क साधला असता, एक कर्मचारी पुणे येथे गेलेला आहे, वेतनाची तरतूद आज होईल उद्या होईल असे आश्वासन वेतन पथकाद्वारा दिले जात आहे. जिल्ह्यातील इतर खाजगी संस्थांमधील शिक्षकांचे वेतन नियमित होत असताना केवळ नगरपालिका संचलित शिक्षकांच्या बाबतच असा दुजाभाव का असा प्रश्न शिक्षकांद्वारा विचारला जात आहे.
          वरील चारही उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोंडी लवकरात लवकर फोडून गेल्या दोन महिन्यापासून रखडलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचे शस्त्र उपसावे लागेल असा इशारा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार, सचिव प्रा. सुनील सोनार, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अतुल इंगळे, जेष्ठ मार्गदर्शकद्वय प्रा. डी. डी. पाटील, प्रा.सुनील गरुड, कार्याध्यक्षद्वय प्रा.सुनील पाटील, प्रा. शैलेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp