चोपडा शहरातील मेन रोड वरील महालक्ष्मी ज्वेलर्सवर जबरी चोरी अडीच किलो चांदी चोरी ; चोर CC TV कॅमेऱ्यात कैद . . .
चोपडा शहरातील मेन रोड वरील व मिलाप स्टोअर्स समोरील महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये मध्य रात्री तीन वाजून चार मिनिटांनी चोरटे दुकानाजवळ आले व तीन वाजून पंधरा मिनिटांनी चोरी करून पसार झाल्याची घटना घडली आहे. सदर दुकानाचे शटर हे कटरने कापले असून दुकाना मध्ये 2 चोरटे आत गेले व 3 चोरटे बाहेर उभे होते असे CC TV कॅमेऱ्यात दिसत आहे. असे दुकानाचे मालक हेमकांत जैन यांनी सांगितले. त्यानंतर वरती राहणारे रहिवाशी जागे झाले असता व त्यांनी आरडाओरड केली असता चोरटे घटना स्थळावरून पसार झाले. चोरट्यांनी दुकानातून दोन ते अडीच किलो चांदीचे वस्तू चोरी केली आहे असे दुकानाचे मालक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. के. के. पाटील आपल्या स्टाफ सह पोहचले असता सर्व शक्यतांची पडताळणी करून नाकेबंदी केली असल्याचे समजते. तसेच सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी चोरीची घटनेची चौकशी केली आहे. चोरटे हे व्हॅगनार कार मध्ये आले होते. सिल्वर कलरची व्हॅगनार कार होती तिचा नंबर M H 09 A Q 1559 असल्याचे समजते.

No comments:
Post a Comment