स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर चा C. B. S. E. दहावीच्या परीक्षेत 100 % निकाल . . . . - S Maharastra 7 News

S Maharastra 7  News

✍️ मुख्य संपादक :- राजेंद्र पाटील

S Maharashtra 7 News

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Breaking

मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील ; S महाराष्ट्र 7 न्युज - 9175949288

Post Top Ad

Responsive Ads Here

14/05/2023

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर चा C. B. S. E. दहावीच्या परीक्षेत 100 % निकाल . . . .

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
              स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर चा C. B. S. E. दहावीच्या परीक्षेत 100 % निकाल . . . .
        केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला असून, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर चा 100 % निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश संपादित केले आहे. एकून 32 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत 90 % च्या पुढे,  22 विद्यार्थ्यांनी 80 % च्या पुढे तर 8 विद्यार्थ्यांनी 60 % पुढे गुण मिळवले आहे .
          त्यात निकिता गोपाल पांडव 92 • 8 % , कु. उत्कर्ष सिसोदे 92 • 8 % , आयुष चंद्रशेखर पाटील 91 • 8 % ,  विश्वजीत नचिकेत महाले 89 • 8 % , अक्षर नीरज अग्रवाल 89 • 2 % , पलक जैन 87 • 2 % या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले असून शाळेने खूप उत्तम प्रकारचे मार्गदर्शन व सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला. शाळेने नेहमीच उत्तम निकालाची परंपरा जपली आहे.
          शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री नीरज अग्रवाल , मुख्याध्यापक श्री. हेमंतकुमार देवरे व उप - मुख्याध्यापक श्री. विनोद अमृतकर यांनी भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज