तांदळवाडी हायस्कूलच्या 12 मुलींना मानव विकास कार्यक्रमांतर्गंत मोफत सायकलीचे वाटप • • • - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

22/06/2023

तांदळवाडी हायस्कूलच्या 12 मुलींना मानव विकास कार्यक्रमांतर्गंत मोफत सायकलीचे वाटप • • •

चोपडा (प्रतिनिधी) : - -
            तांदळवाडी हायस्कूलच्या 12 मुलींना मानव विकास कार्यक्रमांतर्गंत मोफत सायकलीचे वाटप • • •
          वेळेच्या बचतीसह मुलींची 3 किमीची पायपीट थांबणार...
          शिक्षणाची आवड निर्माण करणारा मानव विकास चा उपक्रम...
          उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना खेड्यावरुन लांबून पायपीट करीत शाळेत येतांना, त्यांच्या वेळेची बचत व्हावी, पायपीट थांबावी या उद्देशाने मानव विकास कार्यक्रमांतर्गंत जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी शाळेतील दोंदवाडे येथून साधारण 3 किमीच्या अंतरावरून येणाऱ्या इ. 8 वी ते 10 वी च्या 12 मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले .
         'या मोफत सायकली प्राप्त मुलींनी आता सायकलींच्या वापरातून व्यायामासह आरोग्य जोपासना , वेळेची बचत, थांबणारी पायपीट यातून उपलब्ध शिक्षण संधीचा पुरेपूर उपयोग करीत आपला विकास साधावा ' असे आवाहन सायकल वितरण प्रसंगी उपस्थित शाळेचे संस्थाध्यक्ष डॉ .चंद्रकांत गोकूळ पाटील यांनी केले .
          @ या प्रसंगी यांच्या शुभहस्ते मोफत सायकलीचे वाटप @
        दोंदवाडे येथील सरपंच गं.भा . प्रभावती हंसराज साळुंखे, तांदळवाडी सरपंच सौ सिंधूबाई निंबा भिल, निमगव्हाण उपसरपंच देवानंद लक्ष्मण पाटील, तांदळवाडी उपसरपंच प्रवीण शंकर धनगर,चोपडा परिसर सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सतीश गोकूळ पाटील, संस्था सहसचिव ॲड. हृषिकेश मच्छिंद्रनाथ पाटील, डॉ विनोद जगन्नाथ पवार, योगराज गोकूळ पाटील, संस्थेचे माजी सहसचिव धनराज पोपट पाटील, आधार दाजी पाटील या वेळी मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शासनाच्या विद्यार्थी - विद्यार्थीनी हिताच्या विविध योजनांची माहिती दिली .
         मोफत सुंदर, दणकट , आकर्षक सायकली प्राप्त झालेल्या विद्यार्थीनींनी त्यांचा आनंद व्यक्त करीत आम्ही संधीचं सोनं करू अशी प्रतिक्रिया देतांना इ .5 वी ते 7 वी च्या मुलींनाही हा लाभ मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक अरुण चव्हाण, व्ही .पी . चोधरी , शिक्षक - कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत तर सूत्रसंचालन किसन नरहर पाटील यांनी केले .
       साधारण 3 किमी पेक्षा जास्त व बऱ्याचदा शाळा भरतांना - सुटतांना फारशी वर्दळ नसलेल्या अंतरावरून रोज पायी येतात मुली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp