मंत्र्यांच्या स्वागतसाठी आश्रम शाळेतील मुलांच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही, असले प्रकार सहन केले जाणार नाही : - ना. अनिल पाटील - S Maharastra 7 News Reg No, MH-14-0018812
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

08/07/2023

मंत्र्यांच्या स्वागतसाठी आश्रम शाळेतील मुलांच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही, असले प्रकार सहन केले जाणार नाही : - ना. अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) : - -
         मंत्र्यांच्या स्वागतसाठी आश्रम शाळेतील मुलांच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही, असले प्रकार सहन केले जाणार नाही : - ना. अनिल पाटील
           माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी मंत्री म्हणून म्हणून काहीही संबंध नाही, त्याची मला पुसटशीही कल्पना नव्हती, हेतुपुरस्कर तसा प्रकार कुणी केला असेल तर मुळीच सहन केला जाणार नसून कुणी चुकले असेल तर कुणाला क्षमा केली जाणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया नामदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
          यासंदर्भात त्यांच्या ट्वियर वर देखील त्यांनी ट्विट करून आपला खुलासा केला आहे. राजकीय घडामोडी नंतर भाजप सरकारच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीचे अनिल पाटील मंत्री झाले. मंत्री पदाची शपथ घेतल्यांनंतर पहिल्यांदाच अनिल पाटील यांचे जळगावात आगमन झाले. त्यांचं भव्य स्वागत देखील करण्यात आले. मात्र मंत्री अनिल पाटील त्यांच्या अमळनेर मतदारसंघात गेले असता, त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाळकरी विद्यार्थ्यांना स्वागतासाठी उभे केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत मला कोणतीही कल्पना नसल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.याबाबत अधिक खुलासा करताना ते म्हणाले की याबद्दल मला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती, खरे तर अशा पद्धतीने मुलांना उभे करण चुकीचे आहे.
          मला माध्यमातून माहिती कळाली असून याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी नेहमीच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो वाढदिवसा निम्मित किंवा इतर वेळेस नेहमी विविध आश्रम शाळांना भेटी देऊन त्यांच्यासोबत जेवण करत असतो त्यामुळे या विद्यार्थ्यांचा राजकारण साठी उपयोग करण्याची मला आवश्यकता नाही, त्यांनी फक्त शिकून मोठे झाले पाहिजे याच मताचा मी आहे अशी प्रतिक्रिया मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp