चोपडा महाविद्यालयात NEET गुणवंतांचा पालकासह सत्कार • • •
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आज रोजी NEET परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ.स्मिता संदीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. NEET परीक्षेत 400 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
यात सर्व प्रथम येणारा विद्यार्थी वेदांत सुनिल धमके याला (610), रोशनी रीतेश जगताप (555), लिना संतोष अहिरे (530), कुणाल जितेंद्र पाटील (506), नयन मनीष भाट (465), कुणाल जितेंद्र महाजन (445), दिक्षा अरूण पाटील (431), पायल काशिनाथ सावकारे(416), अनुष्का रामकांत बोरसे (409), नेहा योगराज पाटील (367), प्रज्ञा दिपक पाटील (366), या यशस्वी विद्यार्थ्याचा व पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डाॅ.आषिश सचदेव याने MBBS नंतर PG CETमध्ये AIR 1500 मिळाल्यामुळे आशिष चे मा. अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉ. आशिष सचदेव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतांना तो म्हणाला की, अभ्यासाची दिशा कशी ठरवावी, भविष्य कोणत्या क्षेत्रात घडवायचे हा निर्णय वेळेतच घ्यावा, व आपल्या निर्णयावर ठाम राहावे, सकारात्मक मित्र ठेवावे, व शेवट पर्यंत आईवडील, शिक्षकांना विसरू नये . पालकां मधून सौ. मंगल धमके, संतोष अहिरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थीनी पायल सावकारे हिने देखिल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अॅड संदीप सुरेश पाटील यानी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. पी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. कांचन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन. बी. शिरसाट यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील समन्वयक ए. एन. बोरसे, वरिष्ठ प्रा. आर. आर. बडगुजर, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अतुल पाटील, प्रा. प्रमोद व्ही. पाटील, प्रा. समाधान पाटील, प्रा. भूषण पाटील, प्रा. एस. झेड. सय्यद, प्रा. सौ. डी. एस. पाटील, प्रा. सौ. पुष्पा दाभाडे, प्रा.सौ.राजश्री निकम, प्रा. आर. इ. लांडगे, प्रा. डी. ए. तायडे, प्रा. आर आर. पवार, समन्वयक प्रा. डॉ. शैलेश वाघ, प्रा. संदीप पाटील, श्री निलेश सोनवणे सर्व प्राध्यापक, शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment